दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा तेलुगु सिनेमातून साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. जटाधारा सिनेमात सोनाक्षी दिसणार आहे. आज महिला दिनानिमित्ताने सोनाक्षीच्या या साऊथ सिनेमातील पहिला लूक समोर आला आहे. 'जटाधारा' सिनेमाचं पहिलं पोस्टर आज जागतिक महिला दिनानिमित्त शेअर करण्यात आलं आहे.
'जटाधारा' सिनेमाच्या या पोस्टरवर सोनाक्षीचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये सोनाक्षीचा कधीही न पाहिलेला लूक बघायला मिळत आहे. केस मोकळे सोडून डोक्यावर बिंदी लावली आहे. हातात, डोक्यावर आणि गळ्यात राणीसारखे आभूषण घातल्याचं दिसत आहे. तर हाताची लांबलचक नखं पाहायला मिळत आहेत. या लूकमध्ये सोनाक्षीच्या डोळ्यांत आग दिसत आहेत. "शक्ती आणि सामर्थ्याची ताकद" असं कॅप्शन देण्यात आलं आहे. जटाधारामधील सोनाक्षीचा हा लूक तिची दखल घेण्यास भाग पाडत आहे.
सोनाक्षीचा 'जटाधारा' सिनेमातील हा लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या सिनेमाच्या शूटिंगला १४ फेब्रवारीपासून सुरुवात झाली आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमात सोनाक्षीसह शिल्पा शिरोडकर, रेन अंजली, दिव्या वीज अशी स्टारकास्ट आहे. तर वेंकट कल्याण सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.