Join us

लोकप्रिय अभिनेत्याला मुलगी झाली हो! खास फोटो शेअर करत केला नावाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 13:26 IST

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला लग्नाच्या वर्षभरातच गोंडस मुलगी झाली आहे

साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शरवानंदने ६ मार्च रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी शरवानंदने सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. शरवानंद आणि त्याची पत्नी रक्षिता रेड्डी यांनी मुलीचे स्वागत केले आहे. शरवानंदने लहानग्या मुलीचे खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय शरवानंदने मुलीच्या नावाचा उलगडाही केला.

शरवानंद आणि रक्षिता या दोघांनी जून २०२३ मध्ये लग्न केलं. शरवानंदने त्याच्या नवजात मुलीचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, "प्रेम आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. सर्वात शेवटी एक चांगली बातमी. या मोठ्या आशीर्वादाने मी नवीन वर्षात प्रवेश करत आहे." शरवानंदने खास फोटो शेअर करत मुलीचे नाव लीला देवी मायनेनी  असं ठेवलंय.

दुसऱ्या पोस्टमध्ये, अभिनेत्याने एक गोंडस फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याची मुलगी त्याचे बोट धरून आहे. तिचे नाव शेअर करत त्याने कॅप्शन दिले, "लीला देवी मायनेनी." एका फोटोत त्याची पत्नी रक्षिताने त्यांच्या मुलीचे पाय धरले आहेत. या गुड न्यूजबद्दल शरवानंदचे चाहते आणि सेलिब्रिटींनी या  दोघांचं अभिनंदन केलंय.

टॅग्स :Tollywood