देशाचं नाव इंडियावरुन भारत करण्याचा प्रस्ताव मोदी सरकार आगामी विशेष सत्रात आणण्याची चर्चा आहे. यावरुन संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. जी२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या स्नेहभोजनातील पत्रिकेवरही प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन विरोधकही आक्रमक झाले आहेत. यावर कलाविश्वातील सेलिब्रिटीही व्यक्त होताना दिसत आहेत.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटनंतर आता दाक्षिणात्य अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल झालं आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त होतो. देशाचं नाव भारत करण्यावरुन विष्णू विशालने ट्वीटमधून संताप व्यक्त केला आहे.
शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी मोडणार सनी पाजीच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड? कमावणार ‘इतके’ कोटी
विष्णूने त्याचा एक पाठमोरा फोटो ट्वीट केला आहे. "या शूट लोकेशनवरुन मी विचार करत आहे. काय? नाव बदलणार? पण का? यामुळे आपल्या देशाच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत काय बदल होईल? इंडिया नेहमी भारतच होता. आपल्या देशाला आपण भारत आणि इंडिया म्हणून ओळखतो. आताच भारत म्हणून का?" असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Video : "याला म्हणतात संस्कार", 'गदर २'च्या सक्सेस पार्टीत सनीचा लेक पडला शाहरुखच्या पाया
विष्णूच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी या ट्वीटवर कमेंट करत त्याचं समर्थन केलं आहे. १८-२२ सप्टेंबर संसदेच्या या विशेष अधिवेशनात इंडिया हे नाव बदलून भारत करण्यात येण्याचा प्रस्ताव मांडण्यात येण्याची शक्यता आहे.