Join us

क्रिकेटरशी पहिलं लग्न, काही महिन्यांतच घटस्फोट; आता प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने नव्याने थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:45 AM

मनोरंजनविश्वात गेल्या काही महिन्यांपासून वेडिंग सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात दिग्दर्शक एस. शंकर यांच्या लेकीनेही पुन्हा नव्याने संसार थाटला आहे.

मनोरंजनविश्वात गेल्या काही महिन्यांपासून वेडिंग सीझन सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दाक्षिणात दिग्दर्शक एस. शंकर यांच्या लेकीनेही पुन्हा नव्याने संसार थाटला आहे. नुकतंच एस. शंकर यांची मुलगी ऐश्वर्या हिचा दुसरा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. तिच्या लग्नाला साउथ इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. 

एस. शंकर यांची लेक ऐश्वर्या शंकर हिने तरुण कार्तिकेयनसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. १५ एप्रिलला चेन्नईमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाहसोहळ्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही हजर होते. याशिवाय, रजनीकांत, कमल हसन, सूर्या, विक्रम या सुपरस्टार्सनेही एस. शंकर यांच्या लेकीच्या लग्नाला उपस्थित राहून नव्या जोडप्याला आशीर्वाद दिले. 

ऐश्वर्या शंकर हिने क्रिकेट दामोदरन रोहितशी पहिलं लग्न केलं होतं. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. पण, लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. दामोदर रोहित हा पुडुचेरी क्रिकेट टीमचा कॅप्टन होता. पण, ज्यावर्षी त्यांचं लग्न झालं त्याच वर्षी १६ वर्षांच्या एका मुलीने रोहितवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यामुळे ऐश्वर्या घटस्फोट घेत त्याच्यापासून वेगळी झाली. आता ३ वर्षांनी तिने पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रेटी वेडिंगसेलिब्रिटी