दाक्षिणात्या अभिनेता तेरा सज्जाचा 'हनुमान' (Hanuman) सिनेमा दिवसेंदिवस जास्तच लोकप्रिय होत आहे. सिनेमाची वाढती माऊथ पब्लिसिटी बघता बॉक्सऑफिसवर कमाईतही वाढ पाहायला मिळत आहे. बॉलिवूडच काय हॉलिवूडलाही 'हनुमान' टक्कर देत आहे. हनुमानाची गदा सर्वच सिनेमांवर भारी पडत आहे. सगळीकडेच सिनेमाचं कौतुक होत आहे.
प्रशांत शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला 'हनुमान' कमी बजेटमध्ये बनला आहे. मात्र सिनेमाने बॉक्सऑफिसवर अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सिनेमाचा जलवा आहे. सिनेमातील व्हीएफएक्सचं कौतुक तर इतकं होत आहे की आदिपुरुषची आठवण काढत पुन्हा एकदा आदिपुरुषला ट्रोल करण्यात आलं आहे. व्हीएफएक्सचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे.
सिनेमाचं एकूण कलेक्शन
'हनुमान' सिनेमाचं वर्ल्डवाईड 21.25 कोटी ओपनिंग कलेक्शन होतं. पुढील आठच दिवसात आता सिनेमा 200 कोटींच्या घरात पोहचेल. सिनेमाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन 164.78 कोटी इतकं आहे. अजून यामध्ये आताच्या वीकेंडचं कलेक्शन येणं बाकी आहे. भल्याभल्या सिनेमांना पिछाडीवर टाकत सिनेमा कमाईत पुढे जात आहे.
काय आहे सिनेमाची कहाणी?
अंजनाद्रि गावात राहणाऱ्या हनुमंतची गोष्ट सिनेमात दाखवण्यात आली आहे. गावातच राहणाऱ्या मीनाक्षीच्या तो प्रेमात पडतो. मीनाक्षी शिक्षण घेऊन डॉक्टर बनते तर हनुमंत अशिक्षितच राहतो. एक दिवस जंगलात मीनाक्षीवर दरोडेखोर हमला करतात तेव्हा हनुमंत स्वत:चा जीव धोक्यात घालून तिचं रक्षण करतो. त्याचवेळी हनुमंतला अशी दिव्यशक्ती मिळते जी त्याचं नशीबच पालटते.