'हा' साऊथ स्टार आहे काजोलचा फॅन; तिचा फोन नंबर मिळवण्यासाठीही केली होती धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 03:47 PM2023-12-17T15:47:04+5:302023-12-17T15:47:53+5:30

South star: त्याने प्रत्येक मुलाखतीमध्ये आवडती अभिनेत्री म्हणून काजोलचं नाव घेतलं आहे.

south star kiccha-sudeep-fan-of-kajol-hates-ajay-devgn | 'हा' साऊथ स्टार आहे काजोलचा फॅन; तिचा फोन नंबर मिळवण्यासाठीही केली होती धडपड

'हा' साऊथ स्टार आहे काजोलचा फॅन; तिचा फोन नंबर मिळवण्यासाठीही केली होती धडपड

आपल्या बडबड्या स्वभावामुळे आणि दमदार अभिनयामुळे सर्वांनाच प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे काजोल (Kajol).  गेल्या कित्येक वर्षांपासून ती इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. सध्याच्या घडीला काजोल फार मोजक्या सिनेमांमध्ये दिसून येत आहे. मात्र, तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. इतकंच नाही तर केवळ चाहतेच नाही तर अनेक सुपरस्टारही तिच्या प्रेमात आहेत. यामध्येच साऊथचा एक सुपरस्टारही काजोलचा मोठा चाहता असून त्याने अनेक मुलाखतींमध्ये याविषयी भाष्य केलं आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार किच्चा सुदिप हा काजोलचा प्रचंड मोठा चाहता आहे. इतकंच नाही तर गेल्या २० ते २५ वर्षांपासून तो काजोलचा चाहता असल्याचं दिसून येतं.  सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किच्चा सुदिपच्या मुलाखतींचे काही कट्स एकत्र करुन हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मुलाखतीमध्ये त्याने काजोल त्याची क्रश असल्याचं त्याने सांगितलं आहे.
 

अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. ९० च्या दशकात तिच्या सिनेमांना प्रेक्षक अक्षरश: डोक्यावर घ्यायचे. आता ती मोजकेच प्रोजेक्ट्स घेत असली तरी ते देखील हिट असतात. नुकतंच काजोलने शारिरीक शोषण असलेले सीन्स कधीच करत नाही असा खुलासा केला आहे. हे सीन्स त्रासदायक असतात असंही ती म्हणाली.

सोशल मीडियावर 'काजोल्स वर्ल्ड' नावाचं एक इन्स्टाग्राम पेज आहे. या पेजवर किच्चा सुदिपचे व्हिडीओ कोलाज करुन शेअर केले आहेत. यात एका मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीचं नाव विचारण्यात येतं त्यावर तो काजोलचं नाव घेतो. त्यानंतर आणखी एका मुलाखतीमध्ये 'तुला काजोलचं का आवडते?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, ''कारण ती काजोल आहे म्हणूनच आवडते.'' याचसोबत एका मुलाखतीमध्ये त्याने मला फक्त काजोलसोबतच स्क्रीन शेअर करायला आवडेल असंही सांगितलं होतं. 

दरम्यान, इतकंच नाही तर एका मुलाखतीमध्ये त्याने फक्त काजोलसाठी तो अजय देवगणला भेटला होता असंही त्याने कबूल केलं. सोबतच तिचा नंबर मिळावा यासाठीही तो धडपडत होता असं ही तो यावेळी म्हणाला. विशेष म्हणजे गेल्या २०-२५ वर्षात त्याने त्याच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये आवडत्या अभिनेत्रीचं नाव विचारल्यावर फक्त काजोलचंच नाव घेतलं आहे. 

Web Title: south star kiccha-sudeep-fan-of-kajol-hates-ajay-devgn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.