Ajith Kumar Accident : साउथ सुपरस्टार अजित कुमारचा पुन्हा एकदा कार रेसिंगदरम्यान अपघात झाल्याची घटना घडली आहे. आगामी रेसिंग इव्हेंटसाठी अजित कुमार सध्या पोर्तुगालमध्ये असून, तिथे सरावादरम्यान त्याचा अपघात झाला. सुदैवाने अजित कुमारचे प्राण वाचले, पण कारचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातही अजित कुमारचा दुबईत मोठा अपघात झाला होता.
अजित कुमारचा रेसिंग ट्रॅकवर अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, अजित कुमार एका मोठ्या मोटरस्पोर्ट्स रेसिंग इव्हेंटसाठी पोर्तुगालला गेला आहे. तिथे प्रशिक्षणादरम्यान त्याचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात अजित कुमारला काहीही झाले नाही, मात्र त्याच्या कारचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर अजित कुमारने एका मुलाखतीदरम्यान या अपघातावर भाष्य केले अन् हा एक छोटासा अपघात असल्याचे म्हटले.
महिनाभरापूर्वीच झालेला अपघात अजित कुमारच्या कारचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 8 जानेवारी रोजी अजित कुमारचा दुबईतील रेस चॅम्पियनशिपमध्ये अपघात झाला होता. त्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्या अपघातात अजितच्या पोर्श 992 कारचे मोठे नुकसान झाले होते. महत्वाचे म्हणजे, त्या कार रेसिंगमध्ये अजित कुमारने तिसरा नंबर पटकावून भारताची मान उंचावली. याबद्दल त्याचे देशभरातून कौतुक झाले.