Join us

हर हर गंगे! तमन्ना भाटिया महाकुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमात केलं स्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:31 IST

अभिनेत्री तमन्ना भाटियानं त्रिवेणी संगमात स्नान केलं.

 Tamannaah Bhatia: सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या कुंभमेळ्याने जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे. १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. १४४ वर्षांनी आलेला हा योग चुकू नये म्हणून रोज लाखो भाविक प्रयागराज येथे दाखल होत कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही महाकुंभमेळ्यात हजेरी लावत गंगेत डुबकी मारली. आता अभिनेत्री तमन्ना भाटियानं त्रिवेणी संगमात स्नान केलं.

तमन्ना भाटिया काल शनिवारी प्रयागराजमधील महाकुंभातमेळ्यात पोहचली. यावेळीत तिनं मोठ्या भक्तीभावानं त्रिवेणी संगमात स्नान केलं.  इतकंच नाही तर अभिनेत्रीनं महाकुंभमेळ्यात आपल्या आगामी 'ओडेला २' सिनेमाचा टीझरही (Odela 2 Teaser Video) लाँच केला आहे. 

तमन्नाचा 'ओडेला २' हा चित्रपट २०२१ मध्ये आलेल्या 'ओडेला रेल्वे स्टेशन' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल आहे. यामध्ये तमन्ना एका नागा साधूची भूमिकेत आहे. हा चित्रपट लवकरच देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, टीझर पाहिल्यानंतर चाहत्याची उत्सुकता वाढली आहे.

टॅग्स :तमन्ना भाटियाकुंभ मेळा