भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते गणेश यांचं निधन झालंय. वयाच्या ८० व्या वर्षी गणेश यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गणेश यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. गणेश हे तामिळ मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी तब्बल ४०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. भारतीय मनोरंजन विश्वातील कलाकारांनी गणेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गणेश यांनी ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलं काम
गणेश यांचं पूर्ण नाव दिल्ली गणेश असं आहे. प्रकृतीसंबंधित समस्यांमुळे ९ नोव्हेंबरला रात्री गणेश यांनी अखेरचा श्वास घेतला. गणेश यांचं पार्थिव चेन्नईमधील रामपुरम येथे ठेवलं गेलंय. गणेश यांनी तब्बल ४०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. गणेश यांनी रजनीकांत, कमाल हासन अशा लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केलीय. १९७६ साली गणेश यांनी त्यांच्या फिल्मी कारकीर्दीला सुरुवात केली.
गणेश यांचे हे सिनेमे खूप गाजले
१९८१ साली 'एंगम्मा महारानी' या सिनेमात पहिल्यांदा सहाय्यक अभिनेता म्हणून गणेश झळकले. त्यानंतर 'नायकन', 'सिंधु भैरवी', 'मायकल मदाना काम राजन' अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. 'पासी' या सिनेमासाठी त्यांनी तमिळनाडू राज्य सरकारचा विशेष फिल्म पुरस्कार मिळाला. याशिवाय दिल्लीमध्ये गणेश यांचा काही वर्षांपूर्वी सिनेसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.