'गेम चेंजर' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. RRR नंतर राम चरणचा हा सिनेमा पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. 'शिवाजी द बॉस', 'रोबोट', 'इंडियन', 'अपरिचित' अशा सुपरहिट सिनेमांमुळे स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार करणाऱ्या शंकर यांचा 'गेम चेंजर' हा नवीन सिनेमा आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी राम चरणचे चाहते आतुर आहेत. अशातच राम चरणचा बहुचर्चित 'गेम चेंजर' सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर आलाय. कसा आहे हा सिनेमा? जाणून घ्या.
राम चरणच्या 'गेम चेंजर'चा पहिला रिव्ह्यू समोर
राम चरणच्या 'गेम चेंजर' सिनेमाचा रिव्ह्यू समोर आलाय. ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाने हा रिव्ह्यू दिला असून त्यांनी राम चरण आणि शंकरचा हा सिनेमा इतका खास नाही असं म्हटलंय. या रिव्ह्यूनुसार, "राम चरणचा आजवरचा सर्वात वाईट सिनेमा आहे. इतकंच नव्हे सिनेमात सगळ्यांचे परफॉर्मन्स अप टू द मार्क नाहीत. सिनेमाची कहाणी, डायलॉग आणि पटकथा आउटडेटेड झाली आहे. गेम चेंजरचे दिग्दर्शक शंकर यांनी आता रिटायर झालं पाहिजे."
'गेम चेंजर' सिनेमाबद्दल
'गेम चेंजर' सिनेमा १० जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात राम चरणसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे. एस. शंकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. RRR नंतर प्रमुख भूमिका असलेला राम चरणचा हा बहुचर्चित सिनेमा आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा पाहायला राम चरणचे चाहते आतुर आहेत. अशातच सिनेमाचा पहिला रिव्ह्यू इतका वाईट आल्याने 'गेम चेंजर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होणार अशी शक्यता आहे.