Join us

Pushpa 3चं टायटल आलं समोर, तिसऱ्या भागात हा अभिनेता बनणार खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:58 IST

Pushpa 2 : The Rule : पुष्पा २: द रुल रिलीज होण्याआधीच या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल निश्चित झाला आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता यासंबंधीची माहिती समोर आली आहे.

अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २: द रुल'(Pushpa 2:The Rule)बद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर निर्मात्यांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 'पुष्पा २: द रुल' रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाचा तिसरा सीक्वल निश्चित झाला आहे.

'पुष्पा २: द रुल'च्या तिसऱ्या सीक्वलच्या शीर्षकाशी संबंधित माहिती समोर आली आहे, जो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडाने 'पुष्पा ३'बद्दल अपडेट शेअर केली आहे आणि चित्रपटाच्या पुढील सीक्वलच्या खलनायकाबद्दल हिंट दिली आहे. विजय देवरकोंडाने X अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी 'पुष्पा' दिग्दर्शक सुकुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकुमारसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिले की, 'हॅपी बर्थडे सुकुमार सर. मी तुम्हाला चांगले आरोग्य आणि आनंदाची इच्छा करतो. तुमच्यासोबत चित्रीकरण सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. प्रेम आणि मिठी. २०२१ - द राइज, २०२२ - द रुल, २०२३ - द रॅम्पेज.'

'पुष्पा ३'च्या शीर्षकाचे अनावरणविजय देवरकोंडाच्या पोस्टनुसार, 'पुष्पा ३'चे शीर्षक 'पुष्पा ३: द रॅम्पेज' असेल. सुपरस्टार विजय देवरकोंडा तिसऱ्या सिक्वेलमध्ये खलनायकाच्या अवतारात दिसणार आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, 'पुष्पा २: द रुल'मध्ये एक एंड-क्रेडिट सीन असेल ज्यामध्ये चित्रपटाच्या तिसऱ्या सीक्वलचा टीझर समाविष्ट असेल. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पुष्पा २: द रुल ५ डिसेंबरला होईल रिलीज अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपट 'पुष्पा २: द रुल' ५ डिसेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पडद्यावर येण्याआधीच चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने ८० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाविजय देवरकोंडा