Join us

बाबो..! प्रसिद्ध या अभिनेत्रीनं जाहिरात केली शूट, पण नंतर कुत्र्यानं केलं रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:44 IST

प्रसिद्ध अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिला आलेल्या विचित्र अनुभवाबद्दल सांगितले.

'मंकी मॅन', 'पोनियिन सेल्वन १', 'द नाईट मॅनेजर' आणि 'पोनियिन सेल्वन २'मध्ये झळकलेली अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) २०२४मध्ये तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. आता त्याचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तिने खुलासा केला आहे की एका शूटमध्ये तिच्या जागी कुत्र्याला रिप्लेस करण्यात आले. शोभिताच्या या खुलाशाने चाहते चकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये शोभिता 'मेड इन हेवन' (Made In Heaven Web Series) वेब सीरिजचा को-स्टार जिम सरभसोबत दिसते आहे.

व्हिडीओमध्ये शोभिता नेहा धुपियाला सांगतेय की, शूटमध्ये तिच्याऐवजी कुत्र्याला कसे घेण्यात आले. शोभिताने सांगितले की, तिला रात्री साडे अकरा वाजता ऑडिशनसाठी कॉल आला होता. त्याला ते भीतीदायक वाटले. व्हिडीओमध्ये शोभिता म्हणतेय, 'मला रात्री साडे अकरा वाजता ऑडिशनसाठी कॉल आला आणि मला ते खूप भीतीदायक वाटले. मी ऑडिशनला गेले आणि 'तुला कास्ट करण्यात आले आहे' असे सांगण्यात आले. मी गोव्याला गेलो. थायलंड किंवा ऑस्ट्रेलिया नाही, तर गोवा, पण तरीही मी उत्साही होते.

अभिनेत्रीच्या जागी लागली कुत्र्याची वर्णीशोभिता पुढे म्हणाली की, 'शूटचा पहिला दिवस चांगला गेला, पण कॅमेऱ्यात काही अडचणी आल्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी शूटिंग पुन्हा शेड्यूल करण्याचा निर्णय घेतला. नंतर, क्लायंटने फोटो पाहिले आणि त्यांना वाटले की ते ब्रँड इमेजसाठी योग्य वाटले नाही. त्या भूमिकेसाठी मी खूप आत्मविश्वासू दिसत आहे, असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी माझ्याऐवजी कुत्र्यासोबत शूट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शोभिताने सांगितले की, तिला पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की ही मुलगी नीट काम करू शकत नाही. अति आत्मविश्वास दिसतो आहे आणि ब्रँडच्या इमेजला ते चांगलं वाटत नाही. शोभिता म्हणाली, 'माझ्या जागी त्यांनी कुत्र्याची निवड केली, पण मला पैसे मिळाले, त्यामुळे काही फरक पडत नाही.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी