Join us

"स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे..." राम चरणची पत्नी उपासनाचा खुलासा, १ हजार १३० कोटींची आहे मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:17 IST

उपासना एक मोठं बिझनेस एम्पायर सांभाळत आहे.

 राम चरण हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीतील अभिनेत्यांपैकी एक आहे. राम चरण हा श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र, राम चरणची पत्नी उपासना (Ram Charan Wife Upasana Konidela) ही एक मोठा व्यवसाय सांभाळत आहे. उपासना ही अपोलो हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रताप सी. रेड्डी यांची नात आहे.  उपासना हिने अलीकडेच नैराश्याचा सामना केल्याचा खुलासा केला. शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर नियंत्रण मिळवणे ही तिची सर्वात मोठी कामगिरी असल्याचं तिनं सांगितलं. 

कंटेंट क्रिएटर मासूम मीनावाला यांच्याशी झालेल्या संभाषणात उपासनाने अनेक वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला. उपासना म्हणाली, "मी स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचे. तणाव आला की जास्त जेवण करायचे. पण, आता मी निरोगी सवयी विकसित केल्या आहेत आणि तणावाचा सामना करण्याचे चांगले मार्ग शोधले आहेत. आज मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की मी माझं शरीरावर नियंत्रण आहे". पुढे ती म्हणाली,  "मला वाटतं की योग्य दिनचर्या अवलंबल्यानं खूप मदत झाली. यामुळं आयुष्यात संतुलन आलं". 

राम चरण आणि उपासना यांची प्रेमकथा खूप खास आहे. दोघांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली. दोघेही कॉलेजमध्ये चांगले मित्र होते, पण मैत्रीपूर्वी त्यांच्यात खूप भांडण व्हायची. त्यानंतर दोघेही पक्के मित्र बनले. राम चरण शिकण्यासाठी परदेशात गेल्यावर दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते. यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. यानंतर दोघांनी २०११ मध्ये साखरपुडा केला. २०१२ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर ते २०२३ मध्ये मुलीचे पालक झाले. 

टॅग्स :राम चरण तेजा