Join us  

विजय सेथुपती घेतोय लक्ष्मीचा शोध! ही 'लक्ष्मी' आहे तरी कोण? 'महाराजा'चा रहस्यमयी ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:19 AM

विजय सेथुपतीच्या आगामी 'महाराजा' सिनेमाचा सस्पेन्स थ्रिलर असलेला ट्रेलर रिलीज झालाय (maharaja, vijay sethupati)

विजय सेथुपती हा भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. विजयला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. विजयने गेल्या काही महिन्यांत 'जवान', 'मेरी ख्रिसमस' अशा बॉलिवूड सिनेमांमध्येही त्याच्या अभिनयाची छाप पाडली. आता विजयच्या आगामी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. हा सिनेमा म्हणजे 'महाराजा'. विजयच्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. 

विजय घेतोय 'लक्ष्मी'चा शोध? ही लक्ष्मी आहे तरी कोण?

विजय सेथुपतीच्या आगामी 'महाराजा' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की विजय पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. तो तिथे गेल्यावर लक्ष्मी हरवलीय? असं पोलिसांना सांगतो. लक्ष्मी कोण आहे? पैसे, दागिने आहेत का? असं पोलिस विजयला विचारतात. पण विजय काहीच स्पष्ट सांगत नाही. पुढे विजय गुंडांचा मार खाताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर यामुळे मोठी जखम झालेली दिसते. 

ट्रेलरमध्ये दिसतोय अनुराग कश्यप

'महाराजा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शेवटी एका माणसाची पाठमोरी आकृती दिसते. त्याने विजयसारखेच कपडे परिधान केले असतात. पण जेव्हा हा व्यक्ती समोर होतो तेव्हा दिसतं की तो अनुराग कश्यप आहे. अशाप्रकारे अनुराग 'महाराजा' सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमात अनुराग-विजय यांच्यात कॉंटे की टक्कर बघायला मिळणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट अजून समोर आली नाही. पण लवकरच हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

टॅग्स :Tollywoodअनुराग कश्यप