सोशल मीडिया असं एक माध्यम आहे जेथे लहानातील लहान गोष्ट सुद्धा वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होते. यामध्येच सध्या कलाविश्वात दाक्षिणात्य अभिनेत्री निवेथा पेथुराज (Nivetha Pethuraj) आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा लेक उदयनिधी स्टॅलिन (udhayanidhi stalin) यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. उदयनिधी यांनी निवेथाला आलिशान घर गिफ्ट केल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्यामध्ये अभिनेत्रीने आता तिचं मौन सोडलं आहे.
सध्या सोशल मीडियावर निवेथा आणि उदयनिधी यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर, उदयनिधी यांनी निवेथाला दुबईमध्ये आलिशान घर गिफ्ट केल्याचंही म्हटलं जात आहे. यामध्येच आता निवेथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच या सगळ्या अफवा असल्याचंही तिने म्हटलं आहे.
काय म्हणाली निवेथा?
माझ्यावर पैशांचा पाऊस पाडल्याच्या ज्या चर्चा आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत. मी आतापर्यंत शांत होते. कारण, मला वाटत होतं या चर्चा जे लोक पसरवत आहेत. त्यांच्यात थोडीतरी माणूसकी असेल. त्यांना कळत असेल की कोणत्याही ठोस माहितीशिवाय एखाद्या मुलीविषयी अशा चर्चा पसरवू नयेत. ज्यामुळे तिच्या आयुष्यावर याचा परिणाम होईल. पण, गेल्या काही दिवसांपासून फक्त मीच नाही तर माझे कुटुंबियांना सुद्धा मानसिक तणावाखाली वावरत आहेत, असं निवेथा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी कायम प्रामाणिकपणे माझं काम केलं आहे. मी एका चांगल्या कुटुंबातील मुलगी आहे. माझे कुटुंबीय २० वर्षांपेक्षा जास्त काळ दुबईत राहिलेले आहेत.आणि,आताही ते तिथे राहतात. इतकंच नाही तर मी कधीच कोणत्या सिनेमात मला कास्ट करा असं सांगायला गेले नाही. मी २० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मला कधीच पैशाची लालसा नव्हती आणि यापुढेही नसेल."
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या चर्चा खोट्या असून मी ते सिद्ध करु शकते. २००२ मध्ये दुबईमध्ये आम्ही भाड्याने घर घेतलं होतं. मी खूप सर्व सामान्यांसारखं आयुष्य जगते आणि मी कठीण प्रसंगांचा सामना केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सवुक्कू शंकर या युट्यूबरने अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या त्याने तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी निवेथा पेथुराज हिला दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी करुन दिल्याचं म्हटलं होतं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. तसंच ते राज्य सरकारमधील मंत्रीदेखील आहेत.