अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही एक लोकप्रिय नाव आहे. सध्या ती चर्चेत आली आहेत. अभिनेता नागा चैतन्य याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री कठीण काळातून जात होती. पण, आता अखेर अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेम आल्याचं बोललं जात आहे. समांथाचं राज निदिमोरू या व्यक्तीसोबत नाव जोडलं जात आहे. तर राज निदिमोरू नेमका कोण आहे, याबद्दल जाणून घेऊया.
समांथा ही चेन्नई सुपर चँप्स या पिकलबॉल टीमची मालकीण आहे.. नुकतंच समांथा वर्ल्ड पिकलबॉल लीगमध्ये आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी पोहचली होती. यावेळी तिच्यात राज निदिमोरु यांच्यात खास मैत्री पाहायला मिळाली. त्यामुळे चाहत्यांना राज निदिमोरुविषयी उत्सुकता वाढली आहे. तर राज निदिमोरु हा एक दिग्दर्शक आहे. अलिकडेच त्यानं 'सिटाडेल हनी बनी'चं दिग्दर्शन केलं होतं. ज्यात समांथानं काम केलेलं आहे.
आयकॉनिक फिल्ममेकर राज निदिमोरू आणि त्याचा मित्र कृष्णा दसरकोथापल्ली हे चित्रपटसृष्टीत राज आणि डीके या नावाने लोकप्रिय आहेत. तिरुपती येथे जन्मलेल्या राजने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. राज आणि डीके हे D2R फिल्म्सचे सह-संस्थापक देखील आहेत. ही एक निर्मिती कंपनी आहे. 'द फॅमिली मॅन'चाही राज दिग्दर्शक आहे. राज निदिमोरू हा विवाहित आहे. त्याच्या पत्नीचं नाव श्यामली डे असं आहे.