Join us

बॉलिवूडमध्ये वाइल्ड फायर एन्ट्री मारणार 'पुष्पा'? अल्लू अर्जुनने भन्साळींची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:22 IST

Allu Arjun : साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा २' चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे.

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या 'पुष्पा २' (Pushpa 2 Movie) चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. अलिकडेच अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाला भेटायला गेला होता. अल्लू अर्जुनच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली होती. अल्लू अर्जुनपूर्वी त्याचे वडीलही जखमी मुलाला पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, अल्लू अर्जुनबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अल्लू अर्जुन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचे वृत्त आहे. अल्लू अर्जुन गुरूवारी रात्री मुंबईत स्पॉट झाला होता. अल्लू अर्जुन त्याच्या टीमसोबत प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये गेला होता. आता अल्लू अर्जुनचे हे फोटो व्हायरल होत आहेत. 

अल्लू अर्जुन काळ्या रंगाचा हुडी परिधान करून संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयात पोहोचला. अल्लू अर्जुन तिथे पोहोचताच मीडियाने त्याला चारही बाजूंनी घेरले. मीडियाला पाहून अल्लू अर्जुनने चेहरा लपवला. अल्लू अर्जुनची ही कृती पाहून चाहत्यांचा अंदाज आहे की अल्लू अर्जुन त्याच्या पुढच्या चित्रपटातील लूक लपवण्याचा प्रयत्न करत आहे. अल्लू अर्जुन त्याच्या कारच्या मागच्या सीटवर बसलेला दिसला. बऱ्याच दिवसांनी अल्लू अर्जुनने दाढी कापली आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनचा लूक खूपच बदललेला दिसत होता. चाहत्यांचे म्हणणे आहे की ते अल्लू अर्जुनचा पुष्पराजचा लूक खूप मिस करणार आहेत.

मुंबईत पोहोचताच अल्लू अर्जुनने संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा असा अंदाज आहे की अल्लू अर्जुनने त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली आहे. याच कारणामुळे पुन्हा एकदा अल्लू अर्जुनच्या बॉलिवूड पदार्पणाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अल्लू अर्जुन आणि संजय लीला भन्साळी यांनी एकत्र चित्रपट बनवल्यास त्यांची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतील, असे लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या भेटीत अल्लू अर्जुन आणि संजय लीला भन्साळी यांच्यात काय झाले, याची कोणालाच कल्पना नाही.

चाहते झाले हैराण

अल्लू अर्जुनने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याबाबत बोललेला नाही. अल्लू अर्जुनने तर साऊथ इंडस्ट्रीव्यतिरिक्त कुठेही काम करण्याची इच्छा नसल्याचे वक्तव्य केले आहे. अशा परिस्थितीत अली अर्जुनने संजय लीला भन्साळी यांची भेट घेणे चाहत्यांसाठी हैराण करणारे आहे. पुष्पा २ बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट सध्या २००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे. आताही लोकांमध्ये पुष्पाची क्रेझ पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :संजय लीला भन्साळीअल्लू अर्जुन