Join us

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला साखरपुडा केला; आता अयोध्येतच लग्नगाठ बांधणार 'हे' साऊथ कपल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:59 PM

साऊथमधील लोकप्रिय कपलने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मुहुर्त गाठत साखरपुडा केला. आता हे फेमस साऊथ कपल अयोध्येतच लग्नगाठ बांधणार आहेत.

२२ जानेवारीला संपूर्ण देश राममय झाला होता. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा पार पडला. एकीकडे रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तर दुसरीकडे साऊथमधील लोकप्रिय कपलने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मुहुर्त गाठत साखरपुडा केला. आता हे फेमस साऊथ कपल अयोध्येतच लग्नगाठ बांधणार आहे. हे कपल दुसरं तिसरं कोणी नसून अरुण राम गौडा आणि ऐश्वर्या आहेत. 

कन्नड फिल्म स्टार अरुण राम गौडा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ऐश्वर्याबरोबर सात फेरे घेत तो नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरुणने अयोध्येतच लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. "प्रभू श्रीरामांचा भक्त असल्यामुळे मला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक दिवशी साखरपुडा करण्याची इच्छा होती. आम्ही साध्या पद्धतीने साखरपुडा केला. आम्ही दहा वर्षांपेक्षा जास्त वेळ रिलेशनशिपमध्ये आहोत," असं तो 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. पुढे त्याने अयोध्येत लग्न करणार असल्याचंही सांगितलं. 

"आम्ही पहिल्यांदा गेलेयारा बालागा या थिएचर ग्रुपमुळे भेटलो. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. आम्ही एकमेकांना आवडत होतो. पण, तेव्हा आम्ही करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं. आता आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमचे कुटुंबीयही आनंदी आहेत. ऐश्वर्या खूप समजुतदार आहे. माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या वर्षाच्या शेवटी आम्ही अयोध्येत लग्नगाठ बांधणार आहोत," असं पुढे अरुणने सांगितलं. 'लव्ह यू राच्चू', 'पाठीबेकू डॉट कॉम', 'विरातापर्वा', 'मुद्दू मानसे' अशा सिनेमांमध्ये अरुणने काम केलं आहे. 

टॅग्स :Tollywoodराम मंदिरअयोध्या