Join us  

साऊथ स्टार पडला मराठी भाषेच्या प्रेमात; 'या' एका वाक्यामुळे Allu Arjunने जिंकलं मराठी माणसाचं मन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 11:56 AM

Allu Arjun:'पुष्पा' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली असून जवळपास ४५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टारअल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'पुष्पा' (Pushpa The Rise) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली असून जवळपास ४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. त्याचसोबत अभिनेता अल्लू अर्जुनदेखील एका खास कारणामुळे चर्चेत येत आहे. सध्या सोशल मीडियावर अल्लूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो मराठी भाषेत बोलतांना दिसत आहे.

१७ डिसेंबरला अल्लू अर्जुनचा पुप्षा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यापूर्वी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होते. यामध्ये अलिकडेच त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अल्लू अर्जुनने मराठीत संवाद साधायचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न पाहून त्याने मराठी माणसांची मनं जिंकली आहेत. सध्या अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

"सगळ्यांना माझा नमस्कार", असं म्हणत अल्लू अर्जुनने त्याच्या भाषणाची सुरुवात केली. विशेष म्हणजे अल्लूचे हे दोन शब्द ऐकताच उपस्थित सगळ्यांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार (Sukumar) यांनी केलं  आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२२ मध्ये या चित्रपटाचा पुढील पार्ट प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटीरश्मिका मंदाना