Join us

साऊथ सुपरस्टार नयनताराचा थ्रो-बॅक व्हिडीओ पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 19:50 IST

नयनताराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका टीव्ही शोचे अँकरिंग करताना दिसत आहे.

साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या यादीत नयनताराचं नाव पहिल्या क्रमांकाला आहे. विशेष म्हणजे नयनताराला साऊथ इंडस्ट्रीमध्ये लेडी सुपरस्टार म्हणूनही संबोधलं जातं. नुकतेच ती किंग खान शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात दिसली होती. यातच नयनताराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका टीव्ही शोचे अँकरिंग करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नयनताराचा वेगळा लूक पाहायला मिळतोय. ती मल्याळम भाषेत बोलत आहे. कपाळावरची छोटीशी बिंदी, साधा मेक-अप या लुकमध्ये तिला ओळखणे कठीण आहे.  हा अवतार पाहून  ती खरंच नयनतारा आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती टीव्ही शो चामायममध्ये अँकरिंग करत होती.

नयनताराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ,ती लवकरच कन्नप्पा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती प्रभाससोबत 16 वर्षांनंतर काम करणार आहे. दोघेही शिव आणि पार्वतीच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट निर्माते विष्णू मंचू यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश सिंग करणार आहेत. 

टॅग्स :नयनताराTollywood