Join us

स्पृहाने केला हॅशटॅगचा संकल्प

By admin | Published: February 29, 2016 2:17 AM

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली असली, तरी तिचे कविताप्रेम हे तितकेच रसिंकासमोर आले आहे.

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली असली, तरी तिचे कविताप्रेम हे तितकेच रसिंकासमोर आले आहे. तिच्या कवितादेखील अभिनयाप्रमाणेच रसिकांना भावल्या आहेत. याच कविताप्रेमी स्पृहा जोशीने ‘मराठी भाषा दिना’निमित्त एक नवीन हॅशटॅग संकल्प केला आहे. यामध्ये तिने कुसुमाग्रजांची ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ यातील एक कविता हॅशटॅग या संकल्पाद्वारे शूट करून सोशल मीडियावर टाकली आहे. पण, हा हॅशटॅग संकल्प नक्की काय आहे या विचारात पडला असाल? तर ऐका, स्पृहा म्हणते, ‘‘हॅशटॅग संकल्प म्हणजे, २७ फ्रेबुवारीला मराठी भाषेनिमित्त कवी कुसुमाग्रजांचं आपल्याला आवडलेलं एक वाक्य मोबाईलमध्ये शूट करून सगळ्या सोशल वेबसाइटवर ते टाकायचं आणि त्याबरोबर # टॅग मराठी वाक्य हा हॅशटॅग आठवणीने जोडायचा.’’ माझ्याप्रमाणेच मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी हाच संकल्प रसिकांनीदेखील करावा, असे आवाहनदेखील तिने केले आहे.