Join us

तर 'ही' होणार शेखर सुमनची सून?, फोटो शेअर करत दिले लग्नाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:00 IST

अध्ययन सुमन 'स्प्लिट्व्हिला 11' ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत असून हे दोघेही लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे बोलले जाते.

कंगणा राणौत आणि शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन यांच्या अफेअर एकेकाळी जगजाहीर होते. वयाने 20 वर्षाने मोठा असलेला आदित्य पंचोलीसह ब्रेकअप झाल्यानंतर कंगणा अध्ययन सुमनच्या प्रेमात पडली. मात्र अध्ययनचे वडिल शेखर सुमनला मात्र कंगणासह अध्ययनच्या नात्याला विरोध होता. इतकेच नाहीतर सुमन कुटुंबाने कंगणाने त्यांच्या कुटुंबावर जादु टोणा केल्याचेही आरोप लावले होते. अनेक विरोधानंतर अध्ययन आणि कंगणाच्या नात्यात दुरावा निर्माण होते दोघांचेही नाते संपुष्ठात आले होते. 

चित्रपटसृष्टीत पदार्पण करूनही अध्ययनला यश मिळाले नाही.  अध्ययन चित्रपटसृष्टीत येऊन दहा वर्षांहून अधिक काळ लोटून गेला आहे. पण तरीही त्याला बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करता आली नाहीये. अध्ययन त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अता पुन्हा तो चर्चेत आला आहे. सध्या तो स्प्लिट्व्हिला 11 ची स्पर्धक मायरा मिश्राला डेट करत असून हे दोघेही लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे बोलले जाते. तसेच या दोघांचे नाते शेखर सुमननेही स्विकारले असून खुद्द शेखरनेच त्याच्या भावी सुनेसह फोटो शेअर करत यांचे संकेत दिले आहेत. 

अध्ययनने त्याच्या आणि मायराच्या नात्याबद्दल अद्याप मीडियात न बोलणेच पसंत केले असले तरीही सोशल मीडियावरील या दोघांचे फोटोवरून त्यांच्या नात्याविषयी आता सगळ्यांनाच कळले आहे. तुर्तास आता अध्ययन आणि मायरा त्यांच्या नात्याची कबुली देत लग्नबंधनात कधी अडकतात याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :शेखर सुमनअध्ययन सुमन