Join us

स्पृहा जोशीला लॉटरी लागली! हिंदी वेब सीरिजमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकली, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 10:09 IST

नव्या मालिकेनंतर स्पृहा जोशी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूड अभिनेत्यासोबत केलं काम

टीव्ही मालिकांचा चेहरा असलेली स्पृहा जोशी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेली स्पृहाच सध्या सुख कळले या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकांबरोबरच तिने नाटक आणि चित्रपटांतही काम केलं आहे. आता स्पृहा वेब सीरिजमध्ये झळकली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पृहाने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. 

स्पृहाला 'रणनिती' या वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. रणनीती या हिंदी वेब सीरिजमध्ये स्पृहा महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये स्पृहाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिलसोबत स्क्रीन शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत स्पृहाने पोस्ट लिहिली आहे. "रणनीती या वेब सीरिजमधील माझ्या छोट्याशा भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. माझं कौतुक होत आहे. त्यामुळे आनंदी आहे. रंगबाज फिरसेनंतर पुन्हा माझा आवडता कलाकार जिमी शेरगिलसोबत काम करताना मजा आली," असं स्पृहाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. रणनीती आधी स्पृहाने 'रंगबाज फिरसे' या वेब सीरिजमध्ये जिमी शेरगिलसोबत काम केलं आहे. 

स्पृहाची ही नवीन वेब सीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. 'रणनीती : बालाकोट अँड बीयॉन्ड' या वेब सीरिजमध्ये जिमी शेरगिल RAW एजेन्टच्या भूमिकेत आहे.  पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालकोट सर्जिकल स्ट्राइक करत चोख उत्तर दिलं होतं. या वेब सीरिजमध्ये जिमी शेरगिल, लारा दत्ता, आशिष विद्यार्थी, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :स्पृहा जोशीजिमी शेरगिलसेलिब्रिटी