अफलातून अभिनय आणि धमाकेदार अक्शनने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या आगामी जेलर चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मराठी असलेल्या रजनीकांत यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत थलायवा अशी ओळख निर्माण केली. आजही त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागतात. २०११ साली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अचानक रजनीकांत यांची तब्येत बिघडली होती. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘राना’ चित्रपटाच्या शूटिंग करताना रजनीकांत यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांनतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे चेन्नईतील रुग्णालयातून त्यांना उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आलं होतं. १० दिवस रजनीकांत हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. डाएटमुळे रजनीकांत यांचं वजन कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचा खुलासा त्यांच्या भावाने केला होता.
“मी माझ्या आईसाठी अंतवस्त्र खरेदी करतो”, करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला...
रजनीकांत आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. त्यामुळेच रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत कळताच श्रीदेवी यांना काळजी वाटू लागली होती. रजनीकांत यांची प्रकृती सुधारावी यासाठी श्रीदेवी साईबाबांच्या चरणी नतमस्तकही झाल्या होत्या. एवढंच काय, श्रीदेवी यांनी रजनीकांत यांच्यासाठी सात दिवसांचा उपवासही केला होता. रजनीकांत आणि श्रीदेवी यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनीलने खरेदी केली मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल
यादरम्यान रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या चाहत्यांनाही चिंता वाटू लागली होती. त्या काळात त्यांच्या मृत्यूची अफवाही पसरली होती. त्यानंतर काही दिवसांनी रजनीकांत पूर्णपणे बरे होऊन मायदेशी परतले होते. तेव्हा त्यांना बघण्यासाठी चाहत्यांनी एअरपोर्टवर एकच गर्दी केली होती.