Join us

OMG! ‘नागिन’ बनण्यासाठी श्रीदेवींनी पत्करला होता इतका मोठा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 10:45 AM

हिंदी सिनेसृष्टीत नाग आणि सापांवरचे अनेक चित्रपट बनलेत. यातलाच एक गाजलेला सिनेमा म्हणजे, ‘नगिना’. 1986 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी ‘नागिन’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी श्रीदेवींनी अगदी जीवतोड मेहनत केली.

ठळक मुद्दे‘नगिना’ हा  चित्रपट एका काल्पनिक कथेवर चित्रीत करण्यात आला होता. या चित्रपटात ऋषी कपूर, श्रीदेवी, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

हिंदी सिनेसृष्टीत नाग आणि सापांवरचे अनेक चित्रपट बनलेत. यातलाच एक गाजलेला सिनेमा म्हणजे, ‘नगिना’. 1986 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी ‘नागिन’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी श्रीदेवींनी अगदी जीवतोड मेहनत केली. कायमची दृष्टी गमावण्याचा धोकाही पत्करला.‘नगिना’ या चित्रपटात श्रीदेवींनी रजनी या ‘नागिन’ची भूमिका साकारली होती. ‘नागिन’ बनण्यासाठी श्रीदेवींना वेगवेगळे लेन्स वापरावे लागत. वारंवार लेन्स बदलल्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर वाईट परीणाम झाला होता. इतका की, पुन्हा लेन्स वापरले तर कायमचे अंधत्व येईल, असे डॉक्टरांनी त्यांना बजावले होते. सेटवर श्रीदेवी सतत डोळ्यांत औषध टाकायच्या. या चित्रपटातील श्रीदेवींचा अभिनय लोकांना प्रचंड आवडला होता. त्यांच्या डोळ्यांचे बदलते रंग पाहून प्रेक्षकांचाही थरकाप उडाला.

तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, पण श्रीदेवींआधी अभिनेत्री जयाप्रदा यांना हा चित्रपट आॅफर झाला होता. पण चित्रपटांत सापांसोबत काही स्टंट करायचे आहेत, हे कळताच जयाप्रदांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. यानंतर या भूमिकेसाठी श्रीदेवींची निवड झाली होती.

‘नगिना’ हा  चित्रपट एका काल्पनिक कथेवर चित्रीत करण्यात आला होता. या चित्रपटात ऋषी कपूर, श्रीदेवी, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती हर्मेश मल्होत्रा यांनी केली होती.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीत दिग्दर्शक जोडीने संगीतबद्ध केलेली या चित्रपटातील गाणी आजही प्रसिद्ध आहेत. त्यातील ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ हे गाणे तर कोणीच विसरू शकत नाही. त्यावेळी या चित्रपटाची पटकथा, त्यातील संवाद आणि दिग्दर्शन याची बरीच प्रशंसा झाली होती. फिल्मफेअरने २०१३ साली ‘नगिना’आणि ‘मि. इंडिया’ चित्रपटांसाठी श्रीदेवी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले होते.

टॅग्स :श्रीदेवी