Join us

पडद्यावरही शाहरुखचे सुपर स्टारडम

By admin | Published: April 17, 2016 1:23 AM

या शुक्रवारी रिलीज झालेला यशराजचा चित्रपट ‘फैन’मध्ये शाहरुख खानने पडद्यावर हिंदी चित्रपटाचा सुपर स्टार आर्यनची भूमिका साकारली आहे, ज्याचा सामना त्याच्याच एका

या शुक्रवारी रिलीज झालेला यशराजचा चित्रपट ‘फैन’मध्ये शाहरुख खानने पडद्यावर हिंदी चित्रपटाचा सुपर स्टार आर्यनची भूमिका साकारली आहे, ज्याचा सामना त्याच्याच एका कट्टर फैनसोबत होतो. शाहरुख खानला पडद्यावर सुपर स्टारच्या रूपात येण्याची ही तिसरी वेळ आहे. सर्वप्रथम शाहरुखने २००७ मध्ये त्याच्याच होम प्रोडक्शनचा चित्रपट ‘ओम शांती ओम’ मध्ये बॉलिवूडच्या सुपर स्टारची भूमिका साकारली होती, जो पहिल्या जन्मात एक स्ट्रगलर अ‍ॅक्टर ओमप्रकाश असतो आणि पुढील जन्मात सुपर स्टार ओम क पूर बनतो. आपल्या मागील जन्माची सत्यता जाणून ओम क पूर ओमप्रकाशची प्रेमिका आणि अभिनेत्री शांती (दीपिका पदुकोण)च्या मृत्यूचे रहस्य उलगडतो. यानंतर आपल्याच होम प्रोडक्शचा चित्रपट ‘बिल्लू बारबर’ मध्ये शाहरुख खान पुन्हा एकदा एका सुपर स्टारच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात तो यूपीच्या एका गावात आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहचतो, तर तेथे त्याला काही वर्षांपूर्वीचा हरवलेला मित्र (इरफान) भेटतो, जो गावाचा न्हावी असतो. प्रियदर्शनचा हा चित्रपट त्याच्या मल्याळम चित्रपटाचा रीमेक होता. मात्र शाहरुखचा सुपर स्टारडम आणि तीन दिग्गज नायिका करिना कपूर, दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोपडा यांचे आयटम सॉँग देखील या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर मोठे यश मिळवू शकले नाही. या चित्रपटांशिवाय शाहरुखने कित्येक चित्रपटात आपली भूमिका, म्हणजे शाहरुख खानच्या लहान लहान भूमिका केल्या आहेत. मकरंद देशपांडेचा चित्रपट ‘शाहरुख बोला खूबसूरत है तू’ मध्ये तो एक स्टार होता, जो मुंबईत एक रेड सिग्नलवर फूले विकणाऱ्या मुलीला सुंदर बोलून तिचे जीवन कायमस्वरुपी बदलून टाकतो. जोया अख्तरच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट ‘लक बाई चांस’ मध्ये शाहरुखचा लहानसा रोल होता. या चित्रपटात सुपर स्टार म्हणून शाहरुख खान एका पार्टीत नव्याने सफलता मिळविणारा नायक (फरहान अख्तर) ला फिल्म इंडस्ट्री मध्ये टिकून राहण्यासाठीच्या टीप्स शिकविण्याऱ्याच्या भूमिकेत दिसतो. या चित्रपटा शिवाय ‘कुछ मीठा हो जाए’ आणि एमएफ हुसैनचा चित्रपट ‘गजगामिनी’ मध्ये शाहरुख पडद्यावर फिल्म स्टारच्या भूमिकेत दिसला होता.