साऊथच्या चित्रपटांसोबतच संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत एसएस राजामौली यांच्या नावाचा समावेश आहे. एसएस राजामौली यांनी चित्रपटसृष्टीत २१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 12 चित्रपट केले. त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट यशस्वी झाले आहेत. एसएस राजामौली यांचे शेवटचे दोन चित्रपट 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे आणि सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले. दरम्यान राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. राजामौली यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
एसएस राजामौली यांचे घरनिर्माता दिग्दर्शक एसएस राजामौली हैदराबादमध्ये राहतात. हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये राजामौली यांचा आलिशान बंगला आहे. 2008 मध्ये त्यांनी हा बंगला विकत घेतला होता. याशिवाय राजामौली यांच्या देशभरात अनेक स्थावर ठिकाणी प्रॉपर्टी आहेत.
एसएस राजामौली यांचे कार कलेक्शन त्यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या ब्रँडच्या कार आहेत. राजामौली यांच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर आणि बीएमडब्ल्यूचा समावेश आहे, ज्यांची किंमत 1 कोटी ते 1.5 कोटी रुपयांपर्यंत आहे.
एसएस राजामौली यांची एकूण संपत्ती RRR आणि बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या नेट वर्थबद्दल बोललो तर ते सुमारे 20 मिलियन डॉलर्सचे मालक आहेत. भारतीय चलनानुसार राजामौली यांची एकूण संपत्ती 148 कोटी रुपये आहे.