प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजामौली (ss rajamouli ) यांचा RRR हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मागील वर्षी २४ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पाहता पाहता तुफान हिट झाला. विशेष म्हणजे वर्ष सरल्यानंतरही त्याची क्रेझ यत्किंचितही कमी झालेली नाही. या चित्रपटाचा डंका आता सातासमुद्रापार पोहोचला असून अमेरिकेत चक्क हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर रांग लावली आहे.
या चित्रपटाची क्रेझ पाहता चित्रपटाच्या मेकर्सने पुन्हा एका हा सिनेमा अमेरिकेच्या २०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला.विशेष म्हणजे वर्षभरानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांनी तितकंच प्रेम दिलं. RRR च्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी रांग लावल्याचं दिसून येत आहे. ''एसएस राजामौलीच्या RRR चं फॅन सेलिब्रेशन'', असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
1647 आसन क्षमता असलेलं थिएटर फूल
अमेरिकेत चित्रपटगृहाबाहेर लावलेल्या रांगेमध्ये केवळ भारतीय प्रेक्षकच नाही तर अमेरिकन नागरिकदेखील आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत मेकर्सने चित्रपटगृहाच्या आतील फोटोही शेअर केला आहे. सोबतच अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये RRR च्या प्रदर्शनानंतर ३४२ व्या दिवशी
१६४७ आसनक्षमता असलेलं थिएटर हाऊसफूल. हे पाहून खूप आनंद होतोय. लोक आतमध्ये जाण्यासाठी रांग लावून उभे आहेत.दरम्यान, या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने तर जगभरातील अनेकांना वेड करुन सोडलं. हे गाणं जगभरात तुफान गाजलं. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात देखील बेस्ट ऑरिजनल सॉन्ग कॅटगरीमध्ये ते नॉमिनेट झालं आहे. RRR या चित्रपटात रामचरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिस, रे स्टेवेनसन हे कलाकार झळकले आहेत.