‘बाहुबली’ या चित्रपटानंतर सर्वाधिक चर्चा होतेय तर ती ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाची. होय, ‘बाहुबली’नंतर एस. एस. राजमौली ‘आरआरआर’ हा नवा सिनेमा घेऊन येत आहेत. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रामचरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. पण आलिया भट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) सारखे बॉलिवूडचे दिग्गज स्टार्सही सोबतीला आहेत. राजमौलींच्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. साहजिकच या चित्रपटासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा आहे. अजय व आलियाने या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं माहितीये? तर ही रक्कम कोट्यावधीच्या घरात आहे.
चित्रपटात आलियाने मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण या 20 मिनिटांच्या रोलसाठी आलियाने म्हणे 9 कोटी रूपये फी घेतल्याची चर्चा आहे.
अजयच्या फीचा आकडा वाचून तर तुमचे डोळे पांढरे होतील. होय, रिपोर्टनुसार, अजयने या चित्रपटासाठी 7 दिवस शूटींग केलं आणि या 7 दिवसांसाठी त्यानं 35 कोटी रूपये मानधन घेतलं.
ज्युनिअर एनटीआर या चित्रपटात कोमाराम भीमच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने 45 कोटी रूपये घेतल्याचा दावा रिपोर्टमध्ये केला जातोय. रामचरण यानेही अल्लूरी सीताराम राजू ही व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी इतकीच म्हणजे 45 कोटी घेतल्याची चर्चा आहे.
‘आरआरआर’ हा सिनेमा गेल्या 7 जानेवारीला रिलीज होणार होता. पण कोरोना महामारीमुळे पुन्हा एकदा या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम व हिंदी अशा पाच भाषेत एकाचवेळी हा सिनेमा रिलीज होणार आहे.