Joe Westermann Intimate Video Leak: एखादा खेळाडू सेक्स स्कँडलमध्ये अडकणे ही काही आजकालच्या युगात नवीन गोष्ट राहिलेली नाही. अनेक वेळा फुटबॉलपटू अनेकदा सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत. पण आता इंग्लंडचा एक मोठा स्टार खेळाडू अशाच एका प्रकरणामुळे बदनाम झाला आहे. हा खेळाडू म्हणजे रग्बीचा सुपरस्टार जो वेस्टरमॅन (Joe Westermann). जो वेस्टरमॅन याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जो वेस्टरमन सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करताना दिसत आहे. वेस्टरमन एका महिलेसोबत होता आणि एका अज्ञात व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला व तो सोशल मीडियावर पोस्ट केला, अशी घटना झाली.
वेस्टरमॅनचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली. वेस्टरमॅनचा हा व्हिडिओ इंग्लिश मीडियामध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर या खेळाडूला स्पष्टीकरण द्यावे लागले. वेस्टरमॅनने मान्य केले की या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती तोच आहे. एका रिपोर्ट्सनुसार, वेस्टरमॅन ज्या महिलेसोबत अश्लील कृत्य करताना रंगेहाथ पकडला गेला, ती त्याच्याच मित्राची पत्नी आहे.
वेस्टरमॅनला ठोठवण्यात आला दंड
वेस्टरमॅनचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो अस्वस्थ झाला. वेस्टरमॅनला जाहीर माफी मागावी लागली. इतकेच नाही तर त्याची टीम कॅसलफोर्डने या खेळाडूला दंड ठोठावला. रिपोर्ट्सनुसार, वेस्टरमन पेयपान केल्यात नशेत होता आणि त्यामुळेच त्याने सार्वजनिक ठिकाणी असे काम केले आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
पत्नीने वेस्टरमॅनला काढलं घराबाहेर
रिपोर्ट्सनुसार, वेस्टरमॅनला त्याच्या पत्नीने घरातून हाकलून दिले. या व्हिडिओतील ती तरूणी वेस्टरमॅनची पत्नी नसल्याने तिने स्वत:च स्पष्ट केले. वेस्टरमॅन आपल्या पत्नीची फसवणूक करत असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट झाल्याने पत्नीचा पारा चढल्याचे सांगण्यात येत आहे. वेस्टरमॅनची पत्नी म्हणाली- 'ती मी नाही. आम्हाला तीन मुले आहेत, त्यापैकी एक मुलगी १५ वर्षांची आहे आणि तिने अशा गोष्टी सोशल मीडियावर बघू नयेत असे मला वाटते.'
दरम्यान, जो वेस्टरमनबद्दल बोलायचे तर हा खेळाडू इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय रग्बी खेळला आहे. वेस्टरमॅन हा इंग्लंडमधील लोकप्रिय रग्बी खेळाडू आहे. मात्र आता या स्टारला त्याच्या चुकीमुळे प्रचंड ट्रोल केले जात असून मनस्ताप भोगावा लागतो आहे.