Join us

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील सरू वहिनी खऱ्या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 8:00 AM

सरु वहिनींचा हा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिलात का ?

ठळक मुद्देप्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, टीव्ही आणि चित्रपटात नंदिताने स्वत:ला सिद्ध केलं आहे.अभिनेत्री असण्यासोबतच नंदिता उत्तम नृत्यांगना आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahaparivar) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिका गाजली तितकीचं मालिकेतील पात्र सुद्धा लोकप्रिय झालीत. यापैकीच एक म्हणजे, सरू वहिनी. सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे रोजच्या वापरातल्या साड्या, केसांची गच्च वेणी आणि कपाळावर हळदी कुंकू अशा अवतारात मालिकेत वावरणारी सरिता अर्थात सरू वहिनी तुम्ही पाहिलीचं असेन. सरू वहिनींची ही भूमिका अभिनेत्री नंदिता पाटकर (Nandita Patkar) हिने साकारली आहे. नंदिता छोट्या पडद्यावरची एक गुणी अभिनेत्री. 

दोन धाकट्या जाऊ, तीन दीर, अपंगत्व आलेली सासू असा सगळा व्याप सांभाळणारी साधी सरळ , मायळू सरू वहिनी अर्थात नंदिता प्रत्यक्षात चांगलीच ग्लॅमरस आहे.  इन्स्टाग्रामवर तिने एकापेक्षा एक सुंदर व ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे सुंदर आणि हटके फोटोशूट पाहून हीच ती सरू वहिनी यावर क्षणभर विश्वास बसत नाही. 

नंदिता आपल्या दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. 16 मार्च 1982 रोजी मुंबईत जन्मलेली नंदिताने आत्तापर्यंत मालिका व चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. एलिझाबेथ एकादशी,  बाबा  या चित्रपटांत ती दिसली.

एलिझाबेथ एकादशी हा नंदिताचा पहिला सिनेमा. या सिनेमानं तिला एक वेगळी ओळख दिली.मराठी चित्रपटसृष्टीतमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नंदिता एका कॉल सेंटर कंपनीत काम करत होती. जवळपास सात ते आठ वर्षे कार्पोरेट सेक्टरमध्ये तिनं काम केलं.  

रूपारेल कॉलेजात शिकत असताना एका मित्रानं तिला नाटकाच्या ग्रूपमध्ये सहभागी हो, असा सल्ला दिला आणि तिथूनच नंदिताला नाटकाची गोडी लागली.

प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, टीव्ही आणि चित्रपटात नंदिताने स्वत:ला सिद्ध केलं आहे.अभिनेत्री असण्यासोबतच नंदिता उत्तम नृत्यांगना आहे. नंदिताला फिरायला प्रंचड आवडते. नंदिताला वाचनाचीही आवड आहे.

टॅग्स :स्टार प्रवाहटेलिव्हिजन