‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील जयदीप आणि गौरीची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली. मालिकेतील अन्य कलाकारही या मालिकेमुळे घराघरात पोहोचले. पण सध्या चर्चा आहे ती या मालिकेत मानसीची अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासार (Ashwini Kasar) हिच्या पोस्टची. होय, अश्विनीने आईसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. नुकताच अश्विनीच्या आईचा वाढदिवस झाला. आईचा एक जुना फोटो शेअर करत, अश्विनीने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अश्विनीने इन्स्टाग्रामवर तिच्या आईचा एक जुना फोटो शेअर केला आहे. सोबत तिचे आणि आईचे काही कोलाज फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोसोबत ती लिहिते, ‘हॅपी बर्थ डे आई... यु आर माय वर्ल्ड... यु आर माय लाईफ ... तू आमच्यासाठी जे काही केलं आहेस करतेस ते सगळं आणि त्यातून मला काय गवसतं ते सुद्धा इथे नाही मांडता येणार.. तुला भेटल्यावर आपण मारलेल्या मिठीतून ते तुझ्यापर्यंत पोहोचतं का गं?अश्विनीने लिहिलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
कमला आणि मोलकरीण बाई या मालिकांमधून अश्विनी कासार हिने आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक सर्वांना दाखवली आहे. मुंबईमधील रुईया कॉलेजमधून अश्विनीने बॅचलर ऑफ आर्ट्स इन इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक्समधून पदवी संपादन केली आहे. कॉलेजमध्ये असताना अश्विनी कल्चरल फेस्टिव्हलमध्ये खूप सक्रिय असायची. एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. त्याचप्रमाणे एक वकील आणि लेखिका म्हणूनही ती काम करते. आपली अभिनयाची आवड जपण्यासाठी म्हणून तिने नाटकांमध्ये काम करणं चालूच ठेवलं होते. अश्विनी आजदेखील थिएटर आणि छोट्या पडद्यावर सक्रिय असते.