Yed lagla Premach: 'स्टार प्रवाह'वाहिनी वरील 'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत विशाल निकम व पूजा बिरारी यांच्यासह अभिनेता संग्राम साळवी देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. इन्स्पेक्टर जय घोरपडे असं त्याच्या पात्राचं नाव आहे.
नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान मालिकेत दिवसेंदिवस ट्विस्ट पाहायला मिळत आहे. इकडे मंजिरीच्या घरचे तिचं लग्न इन्स्पेक्टर घोरपडेसोबत व्हावं अशी स्वप्न रंगवू लागले आहेत. मंजिरीसारख्या साध्या निर्मळ मनाच्या मुलीने जय घोरपडेसोबत लग्न होऊ नये यासाठी राया प्रयत्न करतो आहे. मंजिरीला आपली बाजू पटवून देण्यासाठी राया पूरेपुर प्रयत्न करत आहे. परंतु आपल्याकडे ठोस पुरावे नसल्याने त्याला याचा प्रचंड त्रास होता आहे. बऱ्याचदा राया त्याची बाजू मंजिरीची आई म्हणजे जिजींकडे मांडतो पण त्याचा हा दावा ते फेटाळून लावतात. असं मालिकेत दाखवण्यात आलं आहे.
अशातच सोशल मीडियावर 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा व्हायरल होणारा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये जय घोरपडेच्या भूतकाळाचा उलगडा करण्यासाठी राया-मंजिरीने कंबर कसली आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस जयबद्दल रायाला माहिती सांगताना दिसतोय. त्यासाठी राया-मंजिरीने एन्काउंटर ३०३ प्रकरण काय आहे याची माहिती मिळवली तर त्यांना सगळं कळेल, असं तो सांगतो. पण जय त्याला याबद्दल विचारणार तितक्यात समोरून येणारा ट्रक त्याच्या अंगावरून जातो आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे आता जयचा खरा चेहरा लोकांना कळेल का? इन्स्पेक्टरच्या घोरपडेच्या कुकर्मांचा शोध लावण्यासाठी राया-मंजिरी केस ३०३ या प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी होतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.