Star Screen Awards 2018 : पती रणवीर सिंगचे ‘ते’ शब्द ऐकून भावूक झाली दीपिका पादुकोण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 09:59 AM2018-12-17T09:59:02+5:302018-12-17T09:59:54+5:30
मुंबई काल रविवारी रंगलेल्या स्टार स्क्रिन अवार्ड्समध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा दिसला. पण हा सोहळा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला तो नवदांम्पत्य दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्यामुळे.
मुंबई काल रविवारी रंगलेल्या स्टार स्क्रिन अवार्ड्समध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा दिसला. पण हा सोहळा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला तो नवदांम्पत्य दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्यामुळे. दीपिका व रणवीरची एन्ट्रीची मुळी लक्षवेधी ठरली. दोघांनीही कलर कॉर्डिनेटेड आऊटफिटमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. दोघांचेही हे लूक कमालीचे चर्चेत राहिले. या अवार्ड शोमध्ये रणवीर सिंगला ‘पद्मावत’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पती रणवीरच्या या उपलब्धीने दीपिका भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
रणवीर स्टेजवर पुरस्कार घेण्यासाठी गेला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रणवीरने एक हृदयस्पर्शी भाषण दिले. हे भाषण होते खास दीपिकासाठी. ‘चित्रपटात मला राणी मिळाली नाही. पण खºया आयुष्यात मला माझी राणी मिळाली,’असे रणवीर म्हणाला. तो केवळ इथेच थांबला नाही तर दीपिकाबद्दलचे प्रेमही त्याने व्यक्त केले. बेबी, आय लव्ह यू...मी सहा वर्षांत जे काही मिळवले. ते केवळ तुझ्यामुळे. कारण तू मला माझ्या लक्ष्यापासून विचलित होऊ दिले नाहीस. तुझे मनापासून आभार...असे रणवीर म्हणाला. पतीच्या तोंडून इतके कौतुक ऐकल्यानंतर कुठल्या पत्नीचे डोळे भरून येणार नाहीत. रणवीरचे ते शब्द ऐकताच दीपिकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागलेत.
भावूक झालेल्या दीपिकाचा फोटो रणवीरने त्याच्या इन्स्टास्टोरीवर पोस्ट केला आहे. या फोटोत दीपिकाच्या डोळ्यांत अश्रू आहेत. रणवीरने दीपिकासोबत आपल्या आईवडिलांचे आणि बहिणीचेही आभार मानलेत. शिवाय आपला पुरस्कार आजीला समर्पित केला. काही महिन्यांपूर्वी रणवीरच्या आजीचे निधन झाले.
या अवार्ड शोमध्ये रणवीरने प्रिंटेड सूट घातला होता. तर दीपिकाने अनामिका खन्नाचा डिझाईनर ड्रेस कॅरी केला होता. सोबत पर्ल ज्वेलरी, हाय बन, स्मोकी आयमेकअपने तिचे लूक आणखीच खुलले होते.