मुंबई काल रविवारी रंगलेल्या स्टार स्क्रिन अवार्ड्समध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा दिसला. पण हा सोहळा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला तो नवदांम्पत्य दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्यामुळे. दीपिका व रणवीरची एन्ट्रीची मुळी लक्षवेधी ठरली. दोघांनीही कलर कॉर्डिनेटेड आऊटफिटमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. दोघांचेही हे लूक कमालीचे चर्चेत राहिले. या अवार्ड शोमध्ये रणवीर सिंगला ‘पद्मावत’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पती रणवीरच्या या उपलब्धीने दीपिका भावूक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
भावूक झालेल्या दीपिकाचा फोटो रणवीरने त्याच्या इन्स्टास्टोरीवर पोस्ट केला आहे. या फोटोत दीपिकाच्या डोळ्यांत अश्रू आहेत. रणवीरने दीपिकासोबत आपल्या आईवडिलांचे आणि बहिणीचेही आभार मानलेत. शिवाय आपला पुरस्कार आजीला समर्पित केला. काही महिन्यांपूर्वी रणवीरच्या आजीचे निधन झाले.या अवार्ड शोमध्ये रणवीरने प्रिंटेड सूट घातला होता. तर दीपिकाने अनामिका खन्नाचा डिझाईनर ड्रेस कॅरी केला होता. सोबत पर्ल ज्वेलरी, हाय बन, स्मोकी आयमेकअपने तिचे लूक आणखीच खुलले होते.