Join us

Star Studio: फॉक्स स्टार स्टुडिओचं झालं स्टार स्टुडिओत नामांतरण, आता हे चित्रपट करणार OTT आणि थिएटरमध्ये रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 5:44 PM

Star Studio: फॉक्स स्टार स्टुडिओ हा देशातील आघाडीच्या फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, ज्याने 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी', 'संजू', 'नीरजा', 'छिछोरे' आणि असे अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे.

फॉक्स स्टार (Fox Star) स्टुडिओ हा देशातील आघाडीच्या फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, ज्याने 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी', 'संजू', 'नीरजा', 'छिछोरे' आणि असे अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. आज फॉक्स स्टार स्टुडिओने जाहीर केले की आता ते नवीन व्हिज्युअल ओळखीसह स्टार स्टुडिओमध्ये नामांतरीत झाले आहे. या ब्रँड रिफ्रेशसह, स्टार स्टुडिओ अत्याधुनिक तंत्रज्ञानासह चित्रपटगृहांमध्ये आणि थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणतील.

आताच्या काळातील कथाकार, टॅलेंटेड आणि क्रिएटिव्ह माइंड्ससोबत स्टार स्टुडिओ काम करणार आहे. तसेच स्टार स्टुडिओ ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा, बबली बाउंसर, गुलमोहर, हृदयमचा रिमेक आणि याशिवाय बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या कथा सादर करणार आहेत. या चित्रपटानंतर स्टुडिओचे बरेच चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत, जे प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.

ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी हे कलाकार दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि स्टार स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट आहे. मधुर भांडारकर दिग्दर्शित बबली बाउंसर सिनेमात तमन्ना भाटिया, सौरभ शुक्ला, अभिषेक बजाज आणि साहिल वैद झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती स्टार स्टुडिओ आणि जंगली पिक्चर्सने केली आहे. राहुल चित्तेला दिग्दर्शित गुलमोहर चित्रपटात शर्मिला टागोर, मनोज बाजपेयी, सिमरन ऋषी बग्गा, अमोल पालेकर आणि सूरज शर्मा हे कलाकार दिसणार आहेत. हृदयम मल्याळम भाषेत रिलीज झालेली ही प्रेमकथा असून तिचा रिमेक येणार आहे. या चित्रपटाची निर्मितीही स्टार स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शन करत आहेत.

स्टार स्टुडिओ हा डिस्नी-स्टारचा एक भाग आहे, जो थिएटर रिलीजसोबत डिस्नी प्लस हॉटस्टारसाठी तयार करत आहे. स्टार स्टुडिओ सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी ब्लॉकबस्टर आणि वैविध्यपूर्ण मनोरंजनाची निर्मिती करण्यात आघाडीवर आहे. स्टुडिओचे उपक्रम भारत आणि जगभरात पसरलेले आहेत.
टॅग्स :ब्रह्मास्त्र