Join us

स्टार होऊ न शकलेले स्टारपुत्र!

By admin | Published: October 19, 2016 2:25 AM

‘वेल बिगेन हाफ डन’ अशी म्हण इंग्रजीमध्ये आहे. चांगली सुरुवात झाली, तर यश मिळवण्यात फारशी अडचण येत नाही.

‘वेल बिगेन हाफ डन’ अशी म्हण इंग्रजीमध्ये आहे. चांगली सुरुवात झाली, तर यश मिळवण्यात फारशी अडचण येत नाही. असाही यामागे एक समज आहे. बॉलीवूडमध्ये या सूत्रानुसार काम होते. जेवढी जास्त मार्केटिंग तेवढेच मोठे यश असा फंडाच आहे. बॉलीवूडमध्ये अपयशाला स्थान नाही, असे मानले जाते. मोठे यश मिळवण्यासाठी बजेटपासून ते मोठ्या कलावंतांच्या नावाचाही पुरेपूर वापर केला जातो. स्टारडम मिळविलेल्या बॉलीवूड कलावंतांना आपल्या मुलांनीही सुरुवातीलाच मोठे यश मिळवावे, असे वाटते. यासाठी तसा प्रयत्नही केला जातो. बिग बजेट सिनेमातून गाजावाजा करून बॉलीवूडमध्ये एंट्री करणाऱ्या आणि अपयशी झालेल्या स्टारपुत्रांची यादी बरीच मोठी आहे.>फरदीन खानअभिनेता फिरोज खान बॉलिवूडमध्ये आॅनस्क्रीन असो किंवा आॅफस्क्रीन असो नेहमीच स्टायलिश लुकमध्ये दिसत असे. फिरोज खानचा मुलगा फरदीन ‘बेटा बाप से बढकर’ असेल असे सर्वांनाच वाटत होते. फरदीनने ‘प्रेम अग्नी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, मात्र त्याला मोठे यश मिळविता आले नाही. सलमान आणि अनिल कपूर यांची भूमिका असलेला ‘नो एंट्री’ याच एका चित्रपटात फरदीन होता की काय, असेच आता वाटते.>जॅकी भगनानीनिर्माता वासू भगनानी यांनी बॉलीवूडमधील भव्य दिव्य चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांनी मुलगा जॅकीच्या बॉलीवूड डेब्यूसाठी चांगली कथा निवडली. जॅकीने ‘फालतू’ या चित्रपटातून डेब्यू केला. या चित्रपटाला समीक्षकांची संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र, त्याला याचा फारसा फायदा झाला नाही. २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी त्याचा ‘यंगिस्तान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गाणी हिट झाली. मात्र, चित्रपटाला फारसे यश मिळवता आले नाही.>इशा देओलधमेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी इशा हिला आपल्या आई-वडिलांप्रमाणे यश मिळवताच आले नाही. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोई मेरे दिल से पुछे’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली. बेस्ट डेब्यूसाठी फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डही मिळविले. मात्र, यानंतर तिला फारसे काही करताच आले नाही. ‘धूम’मध्ये तिने केलेले आयटम नंबर तेवढे लोकांच्या लक्षात राहिले. लग्नानंतर तिने बॉलीवूडला रामराम ठोकला. आई हेमामालिनीसह ती भरतनाट्यमचे स्टेज शो करते.>तुषार कपूरजितेंद्रचा मुलगा तुषार कपूरदेखील होम प्रॉडक्शनच्या चित्रपटाशिवाय अन्य कोणत्याच चित्रपटात आपली छाप पाडू शकला नाही. ‘गोलमाल’ सिरीजमध्ये त्याने केलेली मुक्याची भूमिका जरूर गाजली, पण ती केवळ कॉमेडीसाठीच. काही चित्रपटांतून त्याने गंभीर अभिनय करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला ते काही जमले नाही. बालाजी मोशन पिक्चर्सच्या ‘क्या कुल है हम’ सिरीजमध्ये तो सेक्स कॉमेडी करताना दिसला.>हरमन बावेजा हॅरी बावेजा याचा मुलगा हरमन बावेजा याने ‘लव्ह स्टोरी २०५०’ या सायन्स फिक्शनमधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात त्याच्या अपोझिट प्रियांका चोप्रा हिची भूमिका होती. सायन्स फिक्शन असल्याने अनेक नव्या गोष्टी लव्ह स्टोरी २०५० मध्ये पहिल्यांदाच पाहता आल्या. मात्र बॉक्स आॅफिसवर हरमनचा पहिला चित्रपट यशस्वी ठरला नाही. यानंतर त्याने आशुतोष गोवारिकर यांच्या ‘व्हॉटस युवर राशी’ या चित्रपटात भूमिका केली, मात्र या चित्रपटालाही यश मिळाले नाही.

>यांच्याही पदरी अपयश गाजावाजा करून चित्रपटात पदार्पण करणाऱ्या स्टारपुत्रांची नावे येथेच संपत नाहीत. कपूर खानदानातील राजीव कपूरलादेखील त्याच्या पहिल्या चित्रपटासाठीच लक्षात ठेवले जाते. राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरवचा ‘लव्हस्टोरी’ हाच चित्रपट आठवतो. धमेंद्रचा मुलगा बॉबी देओल आणि राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल यांनी ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, दोघांनाही मोठे यश मिळविता आले नाही. तनुजाची मुलगी तनीषा आणि शर्मिला टागोरची मुलगी सोहाअली खान यांनादेखील आपले स्थान निर्माण करता आले नाही. करण कपूर, कुणाल गोस्वामी, पुरू राजकुमार, रिया सेन, आर्य बब्बर, प्रतीक बब्बर, अध्ययन सुमन, सिकंदर खेर, मिमोह चक्रवर्ती यांनी सुरुवात केली खरी, पण प्रेक्षकांच्या लक्षात राहावे, असे काही करण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. 

उदय चोपडा ख्यातनाम दिग्दर्शक यश चोपडा यांचा मुलगा उदय चोपडाने ‘मोहोब्बते’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली खरी, पण तो या चित्रपटात आपली कमाल दाखवू शकला नाही. अमिताभ आणि शाहरुख खान यांच्या अभिनयापुढे तो कुठेच दिसला नाही. यानंतरच्या अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या तरीही त्याला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करता आली नाही. यशराज बॅनरच्या ‘धूम’ सीरिजमध्ये तो ‘अली’नामक पोलिसाची भूमिका साकारताना दिसतो.