- Suvarna Jain बॉलिवूडचे हे अभिनेते जिममध्ये तास न् तास वर्कआऊट करून आपली बॉडी मेंटेन करत असतात. ते किती मेहनत घेतात, याचविषयी माहिती समोर येत असते. मात्र, या सेलिब्रेटींच्या मागे असतो एक चेहरा. तो त्यांच्यावर खूप मेहनत घेत असतो. तो म्हणजे फिटनेस ट्रेनर. सेलिब्रेटींसाठी हे फिटनेस ट्रेनर त्यांच्यावर तास न् तास मेहनत घेताना दिसतात. जाणून घेऊ या कोण आहेत या सेलिब्रेटींच्या पाठीमागे परफेक्ट बॉडी मिळवून देणारे चेहरे?सैफ अली खान- ट्रेनर सत्यजित चौधरीसत्यजित चौधरी हा फिटनेस ट्रेनर सैफवर बॉडी बिल्डींगसाठी खूप मेहनत घेत असतो. सैफच्या मते, एक्झरसाईज करणे हा प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा बनवणे गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वॉक करण्या इतकी चांगली एक्झरसाईज दुसरी कोणतीच नसल्याचेही सैफने सांगितले. चालणे हे फक्त तुम्हाला फिजिकली नाही, तर मेंटलीही फिट ठेवते. वरुण धवन-ट्रेनर प्रशांत सावंतवरुण कितीही पार्टी-फन लव्हिंग असला तरी रोजच्या रोज जिममध्ये व्यायाम केल्याशिवाय राहत नाही. ‘फिटनेस फ्रीक’ वरुणच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेले असता तुम्हाला त्याचे अनेक ‘जिम पिक्स’ पाहायला मिळतील. पीळदार शरीर कमावलेला वरुण या फोटोंमध्ये किती हॉट दिसत असेल, हे काही वेगळे सांगायला नको. प्रशांत सावंत हा ट्रेनर वरुणला त्याच्या खास टिप्सनी फिट ठेवतो.
जॉन अब्राहम-ट्रेनर विनोद छन्नाबॉलिवूडमध्ये मॅचोमॅन म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहम त्याच्या फिटनसेला घेऊन खूप पब्लिसिटी मिळवत असतो. जिममध्ये वर्कआऊटच करीत नाही, तर योगा करण्यावरही तो विशेष भर देत असतो. विनोद छन्ना फिटनेस ट्रेनर जॉन अब्राहमला फिट ठेवण्यासाठी मदत करतो. सलमान खान-ट्रेनर मनीष अद्वैलकर सलमान खानवरही त्याच्या परफेक्ट लूक बॉडीमुळे तरुणी घायाळ होत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून सलमानच्या फिटनेसवर मनीष अद्वैलकर मेहनत घेतोय. जिम व्यतिरिक्त सलमान सायकलिंग करणे, वॉक करणे या गोष्टींवरही जास्त भर देतो. रणबीर कपूर - ट्रेनर कुणाल गिर कुणाल गिरच्या मदतीने रणबीर कपूर त्याची बॉडी मेंटेन करतो. नुकतेच संजय दत्त बायोपिकसाठी १३ किलो वजन वाढवून रणबीरने संजय दत्तच्या बॉडीप्रमाणे बॉडी बनवल्याचे पाहायला मिळाले. सुदृढ बॉडी कमावण्यात हा केवळ सेलिब्रेटींचा वाटा नसून, या फिटनेस ट्रेनरचाही मोलाचा वाटा असतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सोनू सूद - ट्रेनर योगेश भतेजा सोनू सूद गेल्या वर्षापासून त्याच्या सिक्स पॅक अॅबवर विशेष मेहनत घेतो. दिवसाला ३ तास तो जिम ट्रेनर योगेश भतेजाच्या मदतीने वर्क आऊट करतो, त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळतो. योग्य तो डाएट फॉलो करण्याकडे त्याचा कल असतो.