बॉलीवूडच्या अनेक स्टार्समागे सध्या कायद्याचा ससेमिरा लागला आहे. प्रत्येकाची प्रकरणे वेगवेगळी आहेत. मात्र त्यांच्यावरील कारवाईची चर्चा मीडियात सारखीच होत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे हृतिक रोशन आणि कंगना आहे. जे एकमेकांच्या विरोधात कायद्याच्या नोटीस पाठवत आहेत. या खेळात दोघांना काय मिळाले, हे तर त्यांनाच माहीत? मात्र त्यांचे हे प्रकरण मीडियात खूप गाजत आहे. दुसरीकडे स्वत: अमिताभ बच्चन गोत्यात आले आहेत. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या टी-२० विश्वकप सामन्यादरम्यान सावकाश राष्ट्रगीत म्हटल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दिल्लीत कोणीतरी त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तिकडे करिश्मा कपूर बऱ्याच काळापासून कोर्टाच्या फेऱ्या घालत आहे. संजय कपूरसोबत घटस्फोटानंतर मुलांच्या कस्टडीवरून त्यांच्यात कायदेशीर वाद सुरू आहेत. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून वादात अडकलेले शाहरूख खान आणि आमीर खानच्या विरोधात देशाच्या वेगवेगळ्या भागांत २००पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. आमीर खानवर ‘पीके’ चित्रपटात धर्माची विडंबना करण्यावरून २०पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत.
कायद्याच्या कचाट्यात अडकले स्टार्स
By admin | Updated: March 27, 2016 02:13 IST