व्हॅलेंटाइन डे म्हणजे सर्व प्रेमीयुगुलांचा आवडता दिवस. आपण किती प्रेम करतो हे सांगण्याचा हा दिवस. आपल्या प्रियकर/प्रेयसीसोबत हा दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्याचे प्लॅन्स सर्व तरुणाई करत असते. यामध्ये आपले आवडते बॉलीवूड स्टार्सही अपवाद नाहीत. रणवीर सिंग तर टोरांटोला पोहोचलासुद्धा! दुर्दैवाने रणबीर-कॅटचा व्हॅलेंटाइन डे पुरता वाया गेला. दोघांच्या बे्रक अपमुळे दोघांचा या दिवशी काहीच प्लॅन नव्हता. रणबीरने तर कॅटरिनाला सोडून ‘जग्गा जासूस’ची शूटिंग सुरू केली, पण इतर स्टार्सनी हा दिवस अगदी मजेत साजरा केला. त्याचाच हा वृत्तांत...शाहिद कपूरबॉलीवूड चॉकलेट हीरो शाहिद कपूरचा लग्नानंतरचा हा पहिलाच व्हॅलेंटाइन डे होता. म्हणून तो एक्स्ट्रा स्पेशल साजरा करण्यासाठी त्याने पत्नी मीराला रोमँटिक डिनरला नेले. मीरासाठी त्याने सरप्राइज गिफ्टदेखील घेतले. संपूर्ण दिवस त्याने दोघांसाठीच राखीव ठेवला होता.रणवीर सिंगदीपिकाचा विरह एक दिवसही रणवीरला सहन होत नाही. मग हा पठ्ठा व्हॅलेंटाइन डे ला एकटा कसा राहणार? दीपिकाला सरप्राइज देण्यासाठी टोरांटोला हजर झाला. आपल्या बॉयफ्रेंडला पाहून दीपिकाला आश्चर्याचा धक्का बसला. रणवीर-दीपिकाने नेहमीच ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ असे धोरण अवलंबलेले आहे.सनी लिओनसनी लिओन सध्या तिच्या पतीसोबत लॉस एंजिलिसमध्ये आहे. तिथेच दोघांनीही व्हेलेंटाइन डे साजरा केला. दर वर्षी काहीतरी भन्नाट करण्याचा दोघांचा आग्रह असतो. एकदा तर त्यांनी विमानातून पॅराशूट घालून उडी मारली, एकदा रेस कारमध्ये सुुसाट ड्राइव्ह केले. या वेळी आपण असे काहीतरी अॅडव्हेंचर करणार असल्याचे सनीने सांगितले होेते.सेराह जेन डियाज्गेल्या वर्षी सेराह जेन डियाज्ने फिजी बेटांवर व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता. ती म्हणते, ‘मी खूप रोमँटिक आहे. मात्र, या वर्षी ‘झुबान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मला मोकळा वेळ मिळाला नाही, पण व्हॅलेंटाइन डे माझ्यासाठी नेहमीच स्पेशल राहिलेला आहे.’
स्टार्सचे व्हॅलेंटाइन्स
By admin | Published: February 15, 2016 3:22 AM