Join us

१३ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत थाटला संसार, वर्षभरात झाले विभक्त; मागील ४९ वर्षांपासून गीतकार जगताहेत एकाकी जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:05 IST

Gulzar : गुलजार हे बॉलिवूडचे असे नाव आहे जे केवळ एका युगातच नाही तर प्रत्येक पिढीतल्या प्रेक्षकांना खूप आवडते.

गुलजार (Gulzar) हे बॉलिवूडचे असे नाव आहे जे केवळ एका युगातच नाही तर प्रत्येक पिढीतल्या प्रेक्षकांना खूप आवडते. गीतकार, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर वेगळी छाप सोडली आहे. गुलजार यांचा जन्म पाकिस्तानातील दीना येथे राहणाऱ्या शीख कुटुंबात झाला. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर ते कुटुंबासह मुंबईत आले. आज ते आपला ८९वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

गुलजार यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याची खूप आवड होती, परंतु त्यांनी लेखन थांबवावे आणि शालेय अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे अशी त्यांच्या वडिलांची आणि भावाची इच्छा होती. घरच्यांच्या भीतीमुळे ते गुपचूप लिहीत असे आणि त्यांनी आपले खरे नाव संपूर्ण सिंग कालरा बदलून गुलजार असे ठेवले. या नावाने ते कविता लिहायचे आणि हळूहळू गुलजार या नावाने ते इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाले.

लग्नापूर्वी ठेवली होती अटगुलजार यांचे अभिनेत्री राखीवर जीव जडला होता आणि १९७३ साली अभिनेत्रीसोबत लग्न केले. मात्र, गुलजार यांनी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्रीसमोर एक अट ठेवली होती की ती फिल्मी दुनियेला अलविदा करेल. गुलजार यांची अट मान्य करून राखी यांनी चित्रपटाच्या पडद्यापासून दूर केले होते, पण तरीही या जोडप्यामध्ये फार काळ सर्व काही सुरळीत होऊ शकले नाही.

एका वर्षात तुटले नातेवास्तविक, यश चोप्रांना 'कभी कभी' चित्रपटात राखीला कास्ट करायचे होते, परंतु ही अभिनेत्री तिच्या कमिटमेंटमुळे चित्रपटाला हो म्हणू शकली नाही. अभिनेत्रीने गीतकारांसमोर चित्रपटात काम करण्याचा उल्लेख करताच दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि प्रकरण इतके बिघडले की हाणामारीपर्यंत पोहोचले. या घटनेनंतर राखी आणि गुलजार वेगळे झाले होते.

घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला

गुलजार यांनी राखीला कधीही घटस्फोट दिला नाही आणि हे गीतकार गेल्या ४९ वर्षांपासून एकटे राहत आहेत. मुलगी मेघना गुलजारच्या हितासाठी त्यांनी घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. या दिग्गज गीतकार आणि दिग्दर्शकाचे वैयक्तिक जीवन भलेही गोंधळाने भरलेले असेल, परंतु त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनात यशाच्या अनेक शिखरांना स्पर्श केला.

टॅग्स :गुलजार