'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 08:19 PM2018-11-05T20:19:58+5:302018-11-05T20:20:30+5:30
विक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' या कांदबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे.
'सेक्रेड गेम्स' या वेेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. त्याच्या या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या वेबसीरिजचा दुसरा सीझनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अनेक अडचणी आल्या. मात्र आता या सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफ या सीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
विक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' या कांदबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका रसिकांना खूपच भावली. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्याने भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती लोकप्रियदेखी झाली.
या सीरिजचा दुसरा सीझन दिवाळीत येणे अपेक्षित होते. मात्र पहिला सीझन वादात सापडल्यामुळे दुसऱ्या सीझन येण्याची शक्यता कमी होती.
दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे फँटम फिल्म ही कंपनी बंद करण्याचा निर्णय दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने घेतला. हे तिघेही फँटम फिल्म बॅनर अंतर्गत काम करत होते. विक्रमादित्य आणि अनुरागने सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझनचे दिग्दर्शन केले होते. त्यामुळे विकास बहलसोबत भागीदारी असल्याने विक्रमादित्य आणि अनुरागसोबत काम करावे की नाही याचा विचार नेटफ्लिक्स कंपनी करत होती. तर दुसरीकडे या सीरिजचा लेखक वरूण ग्रोवरवर देखील लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप होते.या तिघांची स्वतंत्र चौकशी नेटफ्लिक्सने केली. यातून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतरच सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझनसाठी नेटफ्लिक्सने हिरवा कंदील दिला. दिवाळी झाल्यानंतर इतर कलाकारांसोबत चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना दिलासा मिळाला आहे.