Join us

Lata Mangeshkar's Health Update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 2:25 PM

Lata Mangeshkar's Health Update : गत सोमवारपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे अलीकडेच २८ सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला होता.

गत सोमवारपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे. त्या लवकरच बºया होऊन घरी परततील, असा विश्वासही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.  श्वसनाचा त्रास होत असल्याने लतादीदींना  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लतादीदींच्या तब्येतीबाबतचे वृत्त कळताच त्यांच्या जगभरातील चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण  आहे. अशात कुटुंबीयांनी आज दुपारी लता दीदींच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट जारी केले. ‘लता दीदींची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी आभार. आम्ही त्यांची प्रकृती उत्तम होण्याची वाट पाहत आहोत, ’असे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

 लता मंगेशकर यांना छातीत संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी रात्री दीड वाजणाच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. पॅटीट समधानी हे लतादीदींवर उपचार करीत आहेत. तूर्तास त्या लवकरात लवकर बºया व्हाव्यात, यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत.  अलीकडेच २८ सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला होता. लता मंगेशकर यांनी हिंदी सिनेमात हजारो गाणी गायली आहेत. प्रादेशिक भाषांमध्येही त्यांनी असंख्य गाणी गायली आहेत.  भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराशिवाय प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :लता मंगेशकर