नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बॉलिवूड सिने-तारकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शहिदांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान आणि कैलाश खेर पुढे सरसावले आहेत. या अभिनेत्यांनी कोट्यवधींचं दान केलं आहे. परंतु याचदरम्यान शाहरुख खानसंदर्भातही काही पोस्ट व्हायरल होत आहेत. शाहरुख खाननं जवानांना अद्यापही मदत न केल्यानं त्यांच्यावर टीकाही केली जातेय. शाहरुख खाननं पाकिस्तानमधल्या गॅस दुर्घटनेतील लोकांना 45 कोटींची मदत केली होती. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु ही न्यूज फेक आहे. शाहरुख खानची बदनामी करण्यासाठी अशा प्रकारच्या न्यूज पेरल्या जात असल्याचं आता समोर आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या बचावासाठी पुढे आले आहेत.शाहरुखच्या चाहत्यांनी त्यासाठी StopFakeNewsAgainstSRK नावाचं हॅशटॅग बनवलं असून, त्यात शाहरुखसंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या खोट्या वृत्ताचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ट्विटमध्ये एक चाहता लिहितो, शाहरुख जेव्हा काही दान करतो तेव्हा ते गुप्तरीत्या करत असतो.
व्हायरल सत्य: पाकिस्तानला शाहरुखनं खरंच 45 कोटींची मदत दिली होती ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:55 AM