आपल्या अवती-भोवती असे अनेक जण असतात, ज्यांना अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचीही भीती वाटत असते. अनेकदा अशी भीती त्यांच्या थट्टेचाही विषय ठरते. बॉलीवूडचे कलाकारही यातून सुटलेले नाहीत. पडद्यावर सुपरमॅन भासणारे अनेक कलावंत घरी चक्क मांजरीला घाबरत असतात. जाणून घेऊया, कलावंतांच्या याच फोबियाविषयी.......रणबीर कपूर आणि झुरळअगदीच विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. रणबीर कपूर झुरळाला खूप घाबरतो. मोठी माणसे नेहमीच लहान गोष्टींना घाबरतात, त्याचे हे लक्षण.अर्जुन कपूर आणि पंखाछतावर गरगर फिरणारा पंखा आपल्या डोक्यात पडतो की काय, अशा प्रकारची भीती अनेकांना सतावत असते. चित्रपटात दहा गुंडांशी एकटा भिडणारा अर्जुन कपूरही त्यातलाच एक आहे.अजय देवगन आणि हाताने जेवणहा काही वाईट प्रकारचा फोबिया नाही. जेवताना कोणत्याही प्रकारचे जंतू हाताद्वारे पोटात जाऊ नयेत, यासाठी ही एका प्रकारे घेतलेली काळजीच आहे. अनेक जणांना हाताने जेवण्यात आनंद मिळत असला, तरी अजय देवगनला ते अजिबात आवडत नाही.सोनम कपूर आणि लिफ्टलिफ्टमध्ये असताना सोनम खूप घाबरलेली असते. हा फोबिया सर्वसामान्य नाही. तुम्ही मोठे स्टार असाल आणि जगभर फिरत असताना मोठमोठ्या हॉटेल्समध्ये गेल्यानंतर हा फोबिया तुम्हाला अस्वस्थ करू शकतो. सोनमचेही हाल तसेच होतात.अनुष्का शर्मा आणि बाईकजब तक हैं जान या चित्रपटात धूम बाईक चालविणाऱ्या अनुष्का शर्माला वास्तविक आयुष्यात गाडी चालविण्याची प्रचंड भीती वाटते. अगदी मागच्या सीटवरदेखील ती बसायला तयार होत नाही. मी पडेन की काय, ही भीती तिला अस्वस्थ करीत असते.कॅटरिना कैफ आणि टोमॅटोअत्यंत मऊ आणि गडद लाल रंगाच्या टोमॅटोची खरं तर कुणालाच भीती वाटण्याचे काहीच कारण नाही. मात्र, कॅटरिनाला टोमॅटोची खरच भीती वाटते. ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ या चित्रपटाची शूटिंग करताना तिला खूप अडचणी आल्या.सेलिना जेटली आणि फुलपाखरेफुलपाखरे ही काही घाबरायची गोष्ट नक्कीच नाही. उलट ती इतकी सुंदर असतात की, स्वत:हून त्यांच्या जवळ जावेसे वाटते, परंतु सेलिना जेटलीला हा त्रास देणारा कीटक वाटतो.विद्या बालन आणि मांजरसर्वांना आवडणारे मांजर विद्या बालनला मात्र खूप भीतिदायक वाटते. ती कोणत्याही मांजराच्या डोळ्यात डोळे घालून पाहूू शकत नाही. हे मांजर आपल्याला डसेल की काय, असेच तिला सारखे वाटत असते.तनिष्का मुखर्जी आणि समोरील प्रेक्षकतनिष्का अपयशी ठरण्यामागे हे तर कारण नसावे. लोकांसमोर जाण्याला, बोलण्याला तनिष्काला भीती वाटते. आता बोला...!अभिषेक आणि फळेअशा प्रकारचा फोबिया खूप कमी लोकांमध्ये आढळतो. ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेकला या फोबियाने घेरले आहे. अशा प्रकारच्या फोबियाला सिबोफोबिया असे म्हटले जाते. फळं दिसले की तो लगेच अस्वस्थ होतो.
स्टार्सलाही छळतो ‘फोबिया’
By admin | Published: October 26, 2015 12:23 AM