बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) च्या आगामी 'ब्रम्हास्त्र' सिनेमाची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत. हा सिनेमा बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा सांगितला जात आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता सिनेमात भूमिका असलेले साऊथचे मेगास्टार नागार्जुन (Nagarjuna) यांनी सिनेमाच्या कथानकाबाबत खुलासा केला आहे.
काय आहे कथानक?
नागार्जुन यांनी पिंकविलासोबत' ब्रम्हास्त्र' सिनेमाबाबत बोलताना सिनेमाचा प्लॉट रिव्हील केला आहे. नागार्जुन यांनी सांगितलं की, 'हा सिनेमा फार मोठ्या स्तरावर तयार करण्यात आला आहे. याच्या स्क्रिप्टमध्ये आजचा काळ आणि वैदिक काळाचं सुंदर मिश्रण दाखवण्यात आलं आहे. मी ब्रम्हास्त्रबाबत जास्त काही सांगू शकत नाही. पण इतकं नक्की सांगेन की, हा सिनेमा एका ५ हजार वर्ष जुन्या अस्त्राबाबत आहे'.
अर्थातच या ५ हजार वर्ष जुन्या अस्त्राच्या मदतीने सिनेमाचा हिरो रणबीर कपूर जगाला वाचवणार आहे. कारण सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये रणबीरच्या हातात एक त्रिशूल दिसत आहे. सोबतच आलियाचा आवाज बॅकग्राउंडला ऐकू येत आहे. म्हणजे भारतीय प्रेक्षकांना त्यांचा आणखी एक सुपरहिरो मिळणार आहे असं दिसतंय.
या सिनेमात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, शाहरूख खान आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. हा सिनेमा तीन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये रिलीज करण्यात येणार असल्याचं समजतं. ज्यावर जवळपास ५०० कोटी खर्च केला जाणार आहे. हा सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे.