Join us

'गोल्ड' मेडलच्या स्वप्नांची कथा पडद्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 8:53 AM

अंगावर रोमांच आणणारा अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे. टीजरच्या सुरुवातीलाच पहिला एक संदेश येतो की, कृपया राष्ट्रगीतासाठी उभे राहा आणि नंतर दुसरा संदेश येतो की, आपल्याला काय वाटते गेल्या २०० वर्षांपासून आपण इंग्रजी राष्ट्रगीतासाठी उभे राहिलो.

मुंबई : अंगावर रोमांच आणणारा अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे. टीजरच्या सुरुवातीलाच पहिला एक संदेश येतो की, कृपया राष्ट्रगीतासाठी उभे राहा आणि नंतर दुसरा संदेश येतो की, आपल्याला काय वाटते गेल्या २०० वर्षांपासून आपण इंग्रजी राष्ट्रगीतासाठी उभे राहिलो. एका एकट्या माणसाच्या स्वप्नांने इंग्रजांना आपल्या राष्ट्रगीतासाठी उभे केले. जेवढी जबरदस्त या ओळी आहेत तेवढा जबरदस्त त्याची पुढील झलक आहे.

रिमा कागती दिग्दर्शित ह्या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत आहेय हा चित्रपट १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी जॉन इब्राहिमचा 'सत्यमेव जयते' आणि देओल बंधूचा 'यमला पगला दिवाना फिर से' सुद्धा प्रदर्शित होणार आहे. पण गोल्डचा टीजर पहिल्यावर तुम्हाला दुसरे काही दिसणार नाही. बेबी, हॉलिडे, रुस्तम आणि 'एअरलिफ्ट' ह्या सारख्या चित्रपटातून अक्षय कुमारने आपल्यातील देशप्रेम जागे केले आहे आणि आता या चित्रपटातून ते अधिक उंचावले जाणार आहे.

गोल्ड चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे त्यात अक्षय कुमार आपल्या कोर्टाच्या जॅकेटमध्ये तिरंगा लपवताना दिसत आहे. या चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीचा काळ दाखवला जाणार आहे ज्यात भारताला आॅलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न असलेल्या भारतीय हॉकी टीमच्या खेळाडूंची गोष्ट आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे.