Join us  

कथा दमदार असणे महत्त्वाचे

By admin | Published: September 18, 2016 1:40 AM

चित्रपटात कलाकार कोण आहे, यावरूनच चित्रपट पाहायचा की नाही, हे प्रेक्षक ठरवतात.

चित्रपटात कलाकार कोण आहे, यावरूनच चित्रपट पाहायचा की नाही, हे प्रेक्षक ठरवतात. त्यामुळेच की काय, बॉलिवूडमध्ये सुपरहिट कलाकारांचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर विक्रमी कमाई करतात. बऱ्याचदा आपल्याला हिंदी चित्रपटांमध्ये कलाकारांची झुंबड पाहायला मिळते. काही दिग्दर्शकांच्या चित्रपटांत तर तीन ते चार हिरो आणि हिरोईन्स दिसतात. मल्टीस्टारर चित्रपटांचा ट्रेंड असतानाही मराठीत ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अनवॉन्टेड’ या चित्रपटात केवळ दोनच कलाकारांना घेऊन सिनेमा तयार करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. अभिनेत्री स्मिता गोंदकर, अभिनेता राजेंद्र शिसतकर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलाकारांच्या संख्येपेक्षा कथा दमदार असणे जास्त महत्त्वाचे असल्याचे या चित्रपटाच्या टीमने सांगितले आहे. ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अनवॉन्टेड’ची कथा फार दमदार असल्याने या चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास त्यांनी सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केला आहे. चार भिंतींमधील नवरा-बायकोची गोष्ट या चित्रपटात हळुवारपणे उलगडण्यात आली आहे. मराठी चित्रपट हा आशयप्रधान असल्याने कथा जर उत्तम असेल, तर चित्रपट दोन कलाकारांमुळेदेखील सुपरहिट ठरू शकतो.