Join us

'आठवणींची गोष्ट आणि गोष्टींची आठवण!', ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकरचा 'कलरफुल' लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 13:30 IST

ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर यांचा आगामी चित्रपट कलरफुलची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोघांचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता ललित प्रभाकरने हा चित्रपट कधी रिलीज होणार याबद्दल सोशल मीडियावर सांगितले आहे.

ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करत या चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे. त्याने पोस्टर शेअर करत लिहिले की, आठवणींची गोष्ट आणि गोष्टींची आठवण ! कलरफूल.

ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकरने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्यावरून हा चित्रपट २ जुलैला रिलीज होणार असल्याचे समजते आहे. नवनवीन आणि साध्या विषयांवर प्रतिभावन कलाकृतीला घडवणारा दिग्दर्शक प्रकाश कुंटे 'कलरफुल' हा रंगानी भरलेला चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. 'कलरफुल'च्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असुन या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे.

चित्रपटाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्याच्या या नवीन जोडी विषयी सांगितले होते की, 'ललित आणि सई हे दोघेही गुणी कलाकार आहेत, दोघांचे काम मी पाहिले आणि अनुभवले सुद्धा आहे, या सगळ्यात 'करण मीरा' हे दोघेच साकारू शकतील या बाबत मी ठाम होतो. सई आणि ललित या दोघांची पात्र जरी वेगळी असली तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे.ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर ही जोडी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना किती भावते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरललित प्रभाकर