Join us

'रूप-मर्द का नया स्वरूप'चे कथानक जाणार १२ वर्षांनी पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 4:15 PM

कलर्सच्या रूप- मर्द का नया स्वरूप या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामध्ये ८ वर्षांचा एक मुलगा रूप हा समाजातील पुरूषप्रधान विचारधारेला काही प्रश्न विचारतो.

कलर्सच्या रूप- मर्द का नया स्वरूप या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामध्ये ८ वर्षांचा एक मुलगा रूप हा समाजातील पुरूषप्रधान विचारधारेला काही प्रश्न विचारतो. एकीकडे त्याचे वडील शमशेर सिंग तरूण असलेल्या रूपला आपली मॅचो प्रतिमा निर्माण करण्याबरोबरच देशप्रेमी होण्यासाठी प्रयत्नशील असतात तर दुसरीकडे रूप हा एक दयाळू आणि परोपकारी मुलगा आहे व तो अशा प्रकारे कधीच विचार करत नाही. रूपचा हा दुविधेतील प्रवास सुरू असतांनाच आता कथानक १२ वर्षांनी पुढे सरकणार आहे. यामध्ये आता रूपचे आयुष्य नवीन टप्प्यात आले असून यामध्ये पुरूषांचे समाजातील वेगळे स्थान आपल्याला दिसणार आहे. हाच विचार पुढे नेत बालिका वधू मधील जग्याची भुमिका केलेले शशांक व्यास रूप म्हणून आपल्या समोर येणार आहे. 

मालिकेतील या भुमिके विषयी आणि मालिके विषयी बोलताना शशांक व्यास म्हणतो ''मी नेहमीच परिणामकारक आणि अनोख्या भुमिकेच्या शोधात असतो. या मालिकेची अनोखी आणि कठोर अशी संकल्पना असल्याने मी ही मालिका स्विकारली. लिंगभेदाविषयी नेहमीच बोलले जाते आणि त्यात बदल झालाच पाहिजे. कलर्स ने आणि रश्मी शर्मा टेलिफिल्म्स ने मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.''

आपल्या भुमिके विषयी बोलतांना दोनल बिश्त म्हणते ''रूप मर्द का नया स्वरूप या सारख्या मालिकेत काम करायला मिळणे हे खूपच आकर्षक आहे. यामध्ये लिंगभेद या समस्येवर भाष्य करण्यात आले आहे. माझा असा विश्वास आहे की पुरूष असोत किंवा महिला त्यांना त्यांच्या आवडीचा मार्ग निवडता यावा. ही संधी मिळाली म्हणून मी खूपच उत्साही आहे आणि सुरूवात होण्याची वाट पाहातोय'' १२ वर्षांनी पुढे सरकत असल्याने आता कथानकात अनेक टि्वस्ट्स आणि काही आश्चर्येही असतील ज्यामुळे प्रेक्षक नक्कीच टिव्ही स्क्रीनकडे आकर्षित होतील.

टॅग्स :कलर्स मराठी